मसाल्याच्या पदार्थांमध्ये असणारी ‘लवंग’. आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते. चव आणि सुगंधाकरिता लवंगांचा वापर फायदेशीर असतो शिवाय अनेक आजार बरे करण्यासाठी लवंगीची मदत होते. इतकेच नाही, तर पूजा-अर्चा, आयुर्वेदिक औषधे यामध्येही लवंगांचा वापर होतो, पण तुमच्या नेहमीच्या वापरातली ही लवंग भेसळयुक्त असेल, तर अपाय होण्याची शक्यता असते. त्यामुळे जाणून घेऊया, खरी आणि भेसळयुक्त लवंग ओळखण्याची सोपी पद्धत –
भेसळयुक्त लवंग ओळखण्यासाठी एक ग्लास पाण्यात 4 ते 5 लवंगा घाला. या लवंगा पाण्याच्या तळाशी गेल्या, तर समजा त्या खऱ्या आहेत. म्हणजे त्या भेसळयुक्त नाहीत. लवंगा पाण्यात तरंगल्या तर नकली आहेत,असे समजावे.
(हेही वाचा – Moon : चीन-अरबांनी भारताकडून शिकले चंद्र कॅलेंडर, काय आहे चंद्राचे महत्व?)
आरोग्यदायी फायदे
– लवंगांमध्ये अँण्टीऑक्सिडंट्स जास्त असतात. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी व्हायला मदत होते.
– कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्याचे गुणधर्म यामध्ये असतात.
– लवंग अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे तोंडाच्या आरोग्यासाठी चांगली आहे. यामुळे मुखदुर्गंधी दूर होते. तोंडातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात.
– रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी लवंग गुणकारी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community