Exercise : आठवड्यातून किमान चार वेळा व्यायाम करा

134
Exercise : आठवड्यातून किमान चार वेळा व्यायाम करा

व्यायामाचा (Exercise) कंटाळा करणाऱ्या माणसांनी किमान आठवड्यातून चार वेळा तरी व्यायाम करावा असे आवाहन फिटनेस तज्ञांनी केले आहे. सुदृढ शरीर आणि निरोगी आरोग्यासाठी शरीराची योग्य पद्धतीने हालचाल सुरू ठेवणे गरजेचे असते. परंतु धकाधकीच्या जीवनशैलीत कित्येक माणसांना व्यायामासाठी वेळ काढता येत नाही. मात्र आठवड्यातून किमान चार वेळा जमेल तसा व्यायाम करा.

दररोज चालणे हा उत्तम व्यायाम (Exercise) आहे. दिवसातून किमान ४५ मिनिटे प्रत्येकाने चालायला हवे. चालण्याने माणसाची पचनक्रिया सुधारते. अनेकजण तज्ञांचा हा सल्ला फारसा गांभीर्याने घेत नाहीत. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर शारीरिक आजार जखडल्यानंतर व्यायामाचे महत्त्व समजून येते. त्यामुळे शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी व्यायाम करून स्वतःला निरोगी बनवा असा सल्ला फिटनेस तज्ञ देतात.

(हेही वाचा – Nuh violence : नूह हिंसाचारामधील आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी)

पावसाळ्यात बहुतेक जणांचे बाहेर चालायला (Exercise) जाणे किंवा जिमला जाणे बंद होते. तीन ते चार महिने घरात बसून काढल्याने वजन तर वाढतेच शिवाय शरीरातील सहव्याधी देखील डोके वर काढतात. मधुमेहग्रस्तांनी दिवसाला किमान ४५ मिनिटे चालण्याकडे कानाडोळा करू नये. मधुमेहग्रस्तांची बैठी जीवनशैली शरीरातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित करते. रक्तदाब आणि हृदयविकाराच्या रुग्णांनाही बैठी जीवनशैली घातक ठरते.

व्यायामाचे फायदे
  • व्यायामामुळे (Exercise) शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते.
  • दीर्घायुष्य लाभते
  • व्यायाम पूर्ण केल्यानंतर शरीरातील चरबी कमी होण्याची प्रक्रिया वेगाने घडते
  • सकाळी व्यायाम (Exercise) केल्याने शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीतपणे पार पडते
  • सकाळी व्यायाम केल्याने मन प्रफुल्लित राहते
  • सकाळी सर्व अवयवांच्या हालचाली झाल्याने दिवसभरात कामात उत्साह राहतो
  • व्यायामामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते
  • शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते
  • पचनक्रिया सुधारते
  • फिटनेस तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम केल्यास सहव्याधीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.