ठाणे येथील कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज स्मृती रुग्णालयात गेल्या आठवड्यात 18 रुग्णांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग आणि नगर विकास विभाग या दोन्ही विभागांच्या कामावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या रुग्णालयात अनेक महत्त्वाची पदे रिक्त असून पुन्हा सेवा पूर्णपणे ढासळल्याने आरोग्य विभागाने आता 72 परिचारिकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पदे लवकरच भरली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
(हेही वाचा – Talathi Exam : तलाठी भरती परीक्षेत अडथळे, टीसीएसला कारणे दाखवा नोटीस)
येत्या 29 ऑगस्ट रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजता परिचारिकांच्या रिक्त पदासाठी मुलाखती घेतल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज स्मृती रुग्णालयात परिचारिकांसाठी 210 पदे आहेत. यापैकी 180 पदे भरली गेली आहेत, तर उरलेली 30 पदे अद्यापही रिक्त आहेत. आरोग्य विभागाने थेट 72 परिचारिकांची कंत्राटी स्वरूपात नियुक्ती करण्याची तयारी दर्शवली आहे. या नियुक्तीत कोरोनाच्या काळात पालिका रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवा दिलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. परिचारिकांची नियुक्ती अतिदक्षता विभाग आणि नवजात शिशुंचा विभाग ३ शिफ्टमध्ये केली जाईल.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मृती रुग्णालयात 500 खाटांची क्षमता आहे. उपस्थितीत या रुग्णालयात 125 शिकाऊ, तर 150 तज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. रुग्णसेवेची वाढती संख्या पाहता डॉक्टरांची संख्याही अपुरी पडत आहे. नगर विकास विभागाने तिच्या आकृतीबंध आराखड्याला मंजुरी दिली होती. त्यात 880 पदे मंजूर झाली होती. रिक्त पदांची भरती प्रक्रिया आरोग्य विभागाने 3 महिन्यांपूर्वीच सुरू केली, असे आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त पदाला प्रतिसाद मिळून येत नसल्याचेही अधिकारी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community