Drugs Seized From Salim : शिवडीतून सलीमला अटक, २ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

सलीम हा दक्षिण मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांना ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती

194
Drugs Seized From Salim : शिवडीतून सलीमला अटक, २ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
Drugs Seized From Salim : शिवडीतून सलीमला अटक, २ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

दक्षिण मुंबईतील किरकोळ ड्रग्स विक्रेत्यांना ‘मेफेड्रोन’ (एमडी) या अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या एकाला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९च्या पथकाने शिवडीतून अटक केली आहे. गुन्हे शाखेने अटक करण्यात आलेल्या ड्रग्स पुरवठादार याच्या जवळून २ कोटी ४ लाख रुपयांचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar On Onion Issue : केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा – शरद पवार)

सलीम हारून रशीद खान (४४) असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स पुरवठादाराचे नाव आहे. शिवडीतून एका चाळीत राहणारा सलीम हा दुबईत 18 वर्षे वाहनचालकाची नोकरी केल्यानंतर मुंबईत आला. त्यानंतर त्याने पश्चिम उपनगरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या वाहनावर चालक म्हणून नोकरी केली.

दरम्यान एका अपघातात अपंगत्व आल्यानंतर त्याने अमली पदार्थ विक्रीच्या धंद्यात शिरकाव केला. अमली पदार्थाची किरकोळ विक्री करणारा सलीम हा नंतर स्वतः लहान विक्रेत्यांना एमडीचा पुरवठा करू लागला होता. सलीम हा इम्रान सोहेब खान या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेऊन दक्षिण आणि मध्य मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांना त्याची विक्री करीत होता. सलीम यांच्याकडे मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. गुन्हे शाखा १ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ९चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक आणि पथकाने सोमवारी शिवडी येथील आदमजी जिवाजी चाळ या ठिकाणी छापा टाकून सलीम याला १ किलो २८ ग्राम मेफेड्रोन सह अटक करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २ कोटी ४ लाख रुपये किंमत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिली. सलीम हा दक्षिण मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांना ड्रग्सची विक्री करीत होता अशी माहिती राजतिलक रोशन यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.