Swimming Pool Opening : अंधेरी येथील क्रीडासंकुलातील जलतरण तलाव शिक्षक दिनापासून होणार खुला

ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव

249
Swimming Pool Opening : अंधेरी येथील क्रीडासंकुलातील जलतरण तलाव शिक्षक दिनापासून होणार खुला
Swimming Pool Opening : अंधेरी येथील क्रीडासंकुलातील जलतरण तलाव शिक्षक दिनापासून होणार खुला

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान यांच्यातर्फे चालविण्यात येत असलेला अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव येत्या ५ सप्टेंबर २०२३ पासून अर्थात शिक्षक दिनापासून सभासदांसाठी सुरू करण्यात येणार आहे. या क्रीडा संकुलात २ जलतरण तलाव असून सूर मारण्याच्या तलावाची सुविधा २६ जुलै २०२३ पासून, तर शर्यतीच्या तलावाची सुविधा ८ ऑगस्ट २०२३ पासून तेथील पाणी शुद्धीकरण यंत्रणा, संतुलन टाकी आणि अन्य काही अभियांत्रिकीय दुरुस्ती कामांसाठी बंद करण्यात आली होती. या दोन्ही तलावांची वरील अभियांत्रिकीय कामे आणि संबंधित चाचण्या आता अंतिम टप्प्यात असून, येत्या ५ सप्टेंबर २०२३ पासून हे दोन्ही जलतरण तलाव सभासदांच्या सेवेत रुजू होत आहेत, असे बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानचे विशेष कार्य अधिकारी सुनील गोडसे यांनी कळविले आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar On Onion Issue : केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा – शरद पवार)

बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान यांच्याद्वारे शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात क्रीडा विषयक विविध सुविधा नियमितपणे उपलब्ध करून देण्यात येत असतात. तसेच आवश्यकतेनुसार क्रीडाविषयक सेवा सुविधा आणि साधनांचे परिरक्षण व दुरुस्ती कामेही नियमितपणे करण्यात येतात. यानुसार येथील जलतरण तलावांच्या दुरुस्तीची कामे बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानद्वारे हाती घेण्यात आली होती.

मुंबईतील नागरिकांना विविध क्रीडा आणि सांस्कृतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंधेरी (पश्चिम) येथे सन १९८८ मध्ये महानगरपालिकेने शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल उभारले आहे. या संकुलाचे व्यवस्थापन आणि परिरक्षण ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’ या महानगरपालिकेच्या सार्वजनिक न्यासाकडे सोपविण्यात आले आहे. या संकुलात क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जलतरण तलाव, खुले मैदान असे एकूण ३ महत्त्वाचे विभाग आहेत. त्याचबरोबर या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्यायामशाळा, कार्डिओ व्यायामशाळा, महिलांकरिता विनामूल्य कराटे प्रशिक्षण वर्ग, जिम्नॅस्टिक, स्केटींग, एरोबिक्स, योग, टेनिस, नृत्य, चित्रकला इत्यादी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

‌याच क्रीडा संकुलात असणारा जलतरण तलाव हा ऑलिम्पिक दर्जाचा असून येथील प्रशिक्षकांनी आजपर्यंत हजारो नागरिकांना पोहण्याची कला अवगत करून दिली आहे. तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटूही या ठिकाणी केलेल्या शास्त्रशुद्ध सरावातून तयार झाले आहेत. जलतरण तलावात प्रगत प्रशिक्षण वर्ग, उन्हाळी शिबिर इत्यादीचेही आयोजन करण्यात येते. आता हा तलाव येत्या ५ सप्टेंबर २०२३ पासून पुन्हा एकदा सभासदांच्या सेवेत रुजू होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.