Shivsena : शिवसेनेत येत्या काळात या कारणांमुळे वाढणार प्रवेशाची रीघ

आर्थिक कमजोर झालेले माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत

370
Shivsena : शिवसेनेत येत्या काळात या कारणांमुळे वाढणार प्रवेशाची रीघ
Shivsena : शिवसेनेत येत्या काळात या कारणांमुळे वाढणार प्रवेशाची रीघ

शिवसेना आणि उबाठा शिवसेनेत आता प्रवेशाची आणि आहे, त्यांना पक्षात कायम ठेवण्याचा प्रयत्न होत असून आगामी काळात शिवसेनेत प्रवेशाची रीघ लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मार्च २०२२ पासून नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांची विकासकामे होत नसून प्रशासकही आता या माजी नगरसेवकांचे ऐकत नसल्याने शिवसेना उबाठा गटातील काही माजी नगरसेवक, तसेच पदाधिकारी आता सत्तेच्या जवळ जावून आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून विकासाची कामे करून घेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता असल्याची कुजबुजच पक्षांतून ऐकायला मिळत आहे.

(हेही वाचा – Chandrayaan – 3 : 70 वर्षात जगभरातील देशांच्या 111 चंद्रमोहिमा; किती झाल्या अपयशी, किती झाल्या यशस्वी?)

मुंबई महापालिकेतील मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रशासक नियुक्त असून तेव्हापासून आजी नगरसेवक आता माजी झाले आहेत. त्यामुळे आता माजी नगरसेवकांचे प्रशासक काहीही ऐकत नसून ज्या पक्षाचे राज्यात सरकार स्थापन आहे, त्याच पक्षातील माजी नगरसेवकांची कामे प्रशासक करत आहेत. त्या नगरसेवकांनी सुचवलेल्या विकासकामांना मंजुरी दिली जात आहे. त्यामुळे सध्या शिवसेना उबाठा गटातील माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी यांची कामेच होत नसल्याने ते प्रचंड त्रस्त आहेत. अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हतबल ठरले आहेत. तब्बल दीड वर्षांपासून निवडणूक न झाल्याने, तसेच विभागातील जनतेची कामे होत नसल्याने माजी नगरसेवक हे जनतेच्या रोषाला धनी होत आहेत. मागील २५ ते ३० वर्षे सत्तेसोबत राहिलेल्या शिवसेना उबाठा गटातील माजी नगरसेवकांना आता विभागातीलच कामे होत नसल्याने विभागात फिरणेही कठीण होत आहे. प्रशासनाकडून कामे न होण्याच्या प्रकाराला त्यांना प्रथमच सामोरे जावे लागत आहे. महापालिकेचा विकासनिधी नसल्याने विभागातील समस्या दूर करण्याचा प्रयत्नही होत नाही. ज्या विभागात त्यांच्या पक्षाचे आमदार, खासदार आहेत, त्यांच्या मदतीने काही माजी नगरसेवक व पदाधिकारी कामे करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथे भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे खासदार आणि आमदार आहेत, त्याठिकाणी शिवसेना उबाठा, तसेच काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना कामे करणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे. विकासकामांसाठी निधी नसल्याने, तसेच स्वत:कडील पैसाही आता संपल्याने आर्थिक कमजोर झालेले माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे आता शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. परिस्थितीमुळे निष्ठा बाजूला ठेवून स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही खासगीत बोलत आहे. ज्यांनी आज पक्षांतर केले ते आज राजासारखे जगत असून निष्ठा वगैरे हे सर्व ठीक असले, तरी निष्ठा जपण्याचा प्रयत्न केला, तर आपण संपून जावू याची खात्री आता अनेकांना पटू लागल्याने निवडणुकीपूर्वी पुन्हा मतदार संघाची बांधणी करायची असेल, तर महापालिकेच्या माध्यमातून विकासकामे आपल्या मतदार संघात होणे आवश्यक आहे. त्याच दृष्टीकोनातून शिवसेना उबाठा गटातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे ऐकायला मिळत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.