भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचे मुंबईत १५० नगरसेवक निवडून येणार असून त्यात रिपब्लिकन पक्षाचे १५ नगरसेवक आलेले असतील, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात महायुतीला निवडून आणण्यासाठी आणि मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आणण्यासाठी रिपाइं कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
(हेही वाचा – Brics conference : पंतप्रधान मोदींचे दक्षिण आफ्रिकेत उपराष्ट्रपतींकडून स्वागत; विमानतळावर चक्क आदिवासी नृत्य)
रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात वांद्रे येथील रंगशारदा सभागृह येथे पार पडले. या शिबिरात केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले आणि खासदार राहुल शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी बोलतांना आठवले यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता उलथवून लावणार असल्याचे सांगत त्यांनी भाजप- शिवसेना- रिपाइं महायुतीचे १५०नगरसेवक निवडून आणणार असा निर्धार केला. या १५० नगरसेवकांमध्ये रिपाइंच्या १५ नगरसेवकांचा समावेश असेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत मुंबईत ६ पैकी एक ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार नाही. यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे आल्याने महायुतीची ताकद अधिक वाढली आहे. महायुतीत गर्दी झाली आहे, त्यात रिपाइंचे काय होणार असे विचारत रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व स्वतंत्र आणि मजबूत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या भागात जनसेवा करून आपली ओळख निर्माण करावी.
आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली ३५० पेक्षा जास्त खासदार निवडून आणून पुन्हा एनडीए सत्तेत येईल. महराष्ट्रात महायुतीला निवडून आणण्यासाठी; मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आणण्यासाठी रिपाइं कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, तसेच रिपाइंच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मित्रपक्षाने ही रिपाइं उमेदवारांना मतदान केले पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community