Assam : बहुपत्नीत्वाविषयी आसाम सरकार मोठा निर्णय घेणार ?

आर्थिक वर्षात बहुपत्नीत्वाविषयी कायदा आणणार

181
Assam : बहुपत्नीत्वाविषयी आसाम सरकार मोठा निर्णय घेणार ?
Assam : बहुपत्नीत्वाविषयी आसाम सरकार मोठा निर्णय घेणार ?

आसाममध्ये एकापेक्षा अनेक विवाह करण्यावर बंदी घालण्याची सिद्धता चालू आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी असा कायदा करण्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. या प्रस्तावित कायद्यासाठी राज्यशासनाने विशेष समितीही स्थापन केली होती. समितीने ६ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्र्यांकडे याविषयीचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर या आर्थिक वर्षात या विषयावर कायदा आणणार असल्याची घोषणा सरमा यांनी केली.

(हेही वाचा – BMC : मुंबई मनपा शाळेतील ३ विद्यार्थिनींवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार; विक्रोळीतील संतापजनक प्रकार)

‘राज्य विधीमंडळ बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यासाठी कायदा करण्यास सक्षम आहे. अन्य राज्येही यावर कायदा करू शकतात’, असे गृह आणि राजकीय विभागाच्या प्रधान सचिवांनी यासंदर्भात बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे. यापूर्वी २३ जानेवारी २०२३ रोजी आसाम शासनाने १४ वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलींशी विवाह करणार्‍या पुरुषांवर पॉक्सोच्या अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर एका महिन्याच्या आत आसाम पोलिसांनी राज्यातील ३ हजारहून अधिक लोकांना अटक केली. यांपैकी बहुतेक अल्पवयीन वधूंचे पती आणि त्यांच्या कुटुंबातील पुरुष सदस्य होते.

कायदा धर्म पाळण्याच्या अधिकारात हस्तक्षेप करत नाही

पत्नींची संख्या मर्यादित करणारा हा कायदा धर्म पाळण्याच्या अधिकारात हस्तक्षेप करत नाही. हे समाजकल्याण आणि सुधारणा यांच्या कक्षेत येते. त्यामुळे एकपत्नीत्वाला मान्यता देणारा हा कायदा कलम २५ चे उल्लंघन करत नाही. सरकारने जारी केलेल्या नोटिसीनुसार इस्लामच्या संदर्भात न्यायालयाने एकापेक्षा अधिक पत्नी असणे, हा धर्माचा अत्यावश्यक भाग नाही, असे म्हटले आहे.

सरमा फेब्रुवारी २०२३ मध्ये म्हणाले होते की, आसाममध्ये बालविवाह थांबला पाहिजे. बालविवाहाच्या विरोधात नवा कायदा २०२६ पर्यंत आणण्याचा विचार करत आहोत. यामध्ये कारावासाची शिक्षा २ वर्षांवरून १० वर्षांपर्यंत वाढवली जाईल.

संवेदनशील आणि सामाजिक विषयाला हात घातल्याने कौतुक

बहुपत्नीत्वामुळे देशावर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे याविषयी काहीतरी करायला हवे, असे सातत्याने सामाजिक माध्यमांतून व्यक्त होत असते. अशा स्थितीत आसाम सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे देशभरात प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे. हिमंता बिस्व सरमा यांनी यापूर्वीही आसाम मधील बेकायदा मदरसे हटवण्यासाठी मोठी कारवाई केली होती. आता बहुपत्नीत्वासारख्या संवेदनशील आणि सामाजिक विषयाला हात घातल्याने त्यांचे कौतुक होत आहे. तसेच त्यांना समर्थनही मिळत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.