लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस जगभरात वाढत चालली आहे. खाण्यापिण्याची योग्य वेळ न पाळणे, ८ तास न झोपणे यामुळे लठ्ठपणा हा आता एका आजाराच्या स्वरूपात समोर येतोय. चुकीचे डाएट आणि व्यायाम न करणे यामुळे तरूण पिढीही आता या लठ्ठपणाच्या विळख्यात येऊ लागली आहे.
लठ्ठपणा कमी करून स्लीम ट्रिम होण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. यासाठी जंक फूड हे अधिक कारणीभूत ठरते. तुम्हालाही पोटावरील लटकलेली चरबी कमी करायची असेल तर तुम्ही व्यायामासह तुमच्या डाएटमधून काही सफेद पदार्थ रद्दबादल करायला हवेत, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. व्हाईट फूड्स हा आता काय नवा प्रकार असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचा.
व्हाईट फूड्स करा कमी आणि व्हा लवकरात लवकर स्लीम ट्रिम
भाताचे सेवन करा कमी
तुमच्या पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होत नसेल आणि तुम्ही त्रस्त असाल तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या डाएटमधून व्हाईट फूड्सपैकी एक भात हा पदार्थ खाणे कमी करावे. तुम्हाला भात खायला आवडत असेल तर हळूहळू याचे सेवन कमी करा. हेल्थ लाईनने दिलेल्या अहवालानुसार, फायबर आणि प्रथिनांच्या अनुपस्थितीमुळे पांढरे तांदूळ जास्त प्रमाणात खाणे हे वजन वाढण्यास किंवा रक्तातील साखरेचे असंतुलन करण्यास कारणीभूत ठरू शकते.
काय खावे – पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसचा आहारात समावेश करून घ्यावा. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त असतात, त्यामुळे मूलत: त्याच वनस्पतीपासून तुम्हाला अधिक फायदा मिळतो.
सफेद ब्रेड
बरेचदा सकाळी नाश्त्यामध्ये ब्रेड खाण्याला अधिक प्राधान्य देतात. मात्र त्यातही सफेद ब्रेड अधिक प्रमाणात खाल्ला जातो. सफेद ब्रेडच्या सेवनाने बेली फॅट त्वरीत वाढते आणि त्यामुळेच तुमच्या आहारातून सफेद ब्रेड तुम्ही काढून टाकणे अधिक गरजेचे आहे. सफेद ब्रेड शरीरातील हाय कोलस्ट्रॉलचे कारण ठरते.
काय खावे – या ब्रेडऐवजी होल ग्रेन ब्रेड खावा. यातील सुधारित पौष्टिकता आणि वाढलेली फायबर सामग्रीदेखील तुमच्या रक्तातील साखरेच्या प्रतिसादावर अंकुश ठेवण्यास आणि कॅलरी नियंत्रणात राहण्यास मदत करते.
(हेही वाचा BMC : सरकारचे महापालिकेकडे दुर्लक्ष : २६ दिवसांनंतरही अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची रिकामीच)
साखर
नो व्हाईट फूड्स डाएटमध्ये पांढरी साखर आहारातून काढून टाकणे हे महत्त्वाचे आहे. आहारामध्ये ब्राऊन शुगर, मध, टर्बिनाडो साखर, मॅपल सिरप याचा समावेश केला जातो. मात्र याचाही सहसा उपयोग करू नये. साखर प्रामुख्याने साध्या कर्बोदकांद्वारे बनलेले असल्यामुळे, त्वरीत रक्तप्रवाहात शोषली जाते आणि भरपूर कॅलरीज असल्यामुळे जाडी वाढणे अथवा डायबिटीससारख्या रोगांना आमंत्रण मिळते.
काय खावे – साखरेऐवजी तुम्ही फळांचा आहारामध्ये समावेश करून घेऊ शकता. फळांमध्ये नैसर्सिक साखर असून त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात जे हानिकारक प्रभाव कमी करण्यास मदत करतात.
मिठाचे सेवन
बहुतेक लोकांना जेवणातील पांढरे मीठ माहीत आहे. परंतु ते गुलाबी, निळे आणि काळे यांसारख्या इतर रंगांमध्ये देखील उपलब्ध असते. मीठ आरोग्यासाठी आवश्यक असले तरी जंक फूडमध्ये याचा अतीव प्रमाणात वापर केला जातो. जास्त मिठाचे सेवन हृदयरोग, स्ट्रोक, लठ्ठपणा आणि किडनीच्या आजाराच्या वाढीव जोखमीसह विविध त्रासांना आमंत्रण देते. त्यामुळे मिठाचे सेवन कमी करावे.
काय खावे – मिठाऐवजी तुम्ही औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा आहारात समावेश करून घ्यावा. हे अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे महत्त्वाचे स्त्रोत असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यात आणि रक्तातील साखरेचे नियमन करण्यात भूमिका बजावू शकतात.
Join Our WhatsApp Community