Badminton World Championship 2023 : पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत पराभव, लक्ष्य सेनची आगेकूच

सिंधू आणि ओकुहारा यांच्या वर्षभरातींमुळे क्रमवारीत दोघींची घसरण

197
Badminton World Championship 2023 : पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत पराभव, लक्ष्य सेनची आगेकूच
Badminton World Championship 2023 : पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत पराभव, लक्ष्य सेनची आगेकूच
  • ऋजुता लुकतुके

बॅडमिंटनच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही पी व्ही सिंधूचा खराब फॉर्म कायम राहिला आणि दुसऱ्या फेरीत तिचा पराभव झाला आहे, तर लक्ष्य सेन तिसऱ्या फेरीत पोहोचला आहे.

माजी विश्वविजेती पी व्ही सिंधूचा खराब फॉर्म जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही कायम राहिला. आणि माजी नंबर वन खेळाडू नोझोमी ओकुहाराकडून सिंधू १४-२१ आणि १४-२१ अशी सहज पराभूत झाली. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच सिंधूचा उपउपान्त्य स्पर्धेपूर्वीच पराभव झाला आहे. दुसरीकडे, लक्ष्य सेन आणि एच एस प्रणॉय यांची आगेकूच मात्र सुरू राहिली.

सिंधू आणि ओकुहारा या दोघी मागच्या वर्षभरात दुखापतींशी झुंजत आहेत. त्यामुळे क्रमवारीतही दोघींची घसरण झाली आहे. पण, एरवी दोघींमध्ये दिसणारी चुरस यावेळी सामन्यात दिसली नाही. ओकुहाराने ही लढत एकतर्फी जिंकली. सिंधू दोन्ही गेममध्ये आपली चमक दाखवू शकली नाही.

(हेही वाचा – BRICS Business Forum Leaders Council : भारतामध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टिम)

पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ६-६ अशी बरोबरी होती. आणि दोघी एकमेकींचा खेळ जोखत होत्या. पण, त्यानंतर मात्र आक्रमक खेळण्याच्या नादात सिंधूच्या चुका वाढत गेल्या. त्या नादात तिने गुणही गमावले. बरोबरीनंतर सलग तीन गुण जिंकत ओकुहारा ९-६ अशी आघाडीवर गेली. पुढे ओकुहारा १९-१२ वर पोहोचली. आणि पहिला गेम तिने २१-१४ असा जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये सिंधू ९-० ने आघाडीवर होती. पण, त्यानंतर ओकुहाराने सिंधूला मोठ्या रॅली खेळण्यात गुंतवलं आणि तिची दमवणूक झाल्यावर गुणही वसूल केले. ओकुहाराने सिंधूची आघाडी १०-१२ अशी कमी केली होती. पण, त्यानंतर ओकुहाराने पुन्हा एकदा अचूक फटक्यांची बरसात केली आणि सलग सहा गुण मिळवत तिने १६-१२ अशी आघाडीही मिळवली. इथून पुढे सिंधूला सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. आणि तिने दुसरा गेमही १४-२१ असा गमावला.

लक्ष्य, प्रणॉयचे दमदार विजय

एच एस प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांनी मात्र आपापले दुसऱ्या फेरीचे सामने आरामात जिंकले. प्रणॉयने इंडोनेशियाच्या चिको वार्दोयोचा २१-९ आणि २१-१४ असा पराभव केला. या सामन्यात प्रणॉयने पूर्ण वर्चस्व गाजवलं. बेसलाईनवरून खेळताना फटक्यांची विविधता आणि त्यात अचूकता साधत त्याने हा दमदार विजय मिळवला.

तर लक्ष्य सेनसाठी कोरियाच्या जीन जिनविरुद्धचा सामना तुलनेनं सोपा होता. २१-११ आणि २१-१२ असा विजय साकारताना लक्ष्यने मागच्या सामन्यातील पराभवाचा वचपाही काढला. लक्ष्यची पुढच्या फेरीत गाठ क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू विदितसानशी पडणार आहे. तर प्रणॉयचा मुकाबला २०२१ चा विश्वविजेता लोह कीन यूशी होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.