कांद्याच्या निर्यात शुल्काविरोधात (Export Duty) नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बेमुदत स्वरूपात आज सलग तिसऱ्या दिवशीही बंद आहे. निर्यात शुल्क वाढविल्यामुळे शेतकरी आक्रमक आहेतच, दुसरीकडे आंदोलने देखील झाली. दरम्यान निर्यात शुल्क वाढविल्यामुळे साहजिकच बाहेरचे आयातदार देश आहेत, ते भारताचा कांदा (Onion Issue) घेणार नाही आणि हीच कुठेतरी भीती असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला मालाला भाव मिळणार नाही, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळं राज्यातील विरोधक तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव (Onion Market) सलग तिसऱ्या दिवशी देखील बंद ठेवण्यात आला आहे. निर्यात मुल्य हटवण्याची तसंच सीमेवर आणि बंदरात अडकलेल्या कांद्याची निर्यात होत नाही, तोपर्यंत कांदा लिलाव सुरू करणार नाही, अशी भूमिका कांदा व्यापाऱ्यांनी घेतली आहे.याच पार्श्वभूमीवर काल जिल्हाभरात तीव्र पडसाद हे पाहायला मिळाले. कुठे रास्ता रोको, कुठे सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली गेली.
(हेही वाचा :Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्था ८.३ टक्क्यांनी वाढण्याचा स्टेट बँकेचा अंदाज)
कांदा विक्रीचा लिलाव सुरू न केल्यास व्यापाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारकडून देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाच्या इशाऱ्यानंतरही कांदा व्यापारी लिलाव बंद ठेवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे कांद्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनी आज कांदा लिलाव सुरू न केल्यास बाजार समिती कारवाईच्या नोटीसा बजावणार, तसेच परवाने रद्द करणार, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community