Varun Industries : सार्वजनिक क्षेत्रातील २ बँकांची 388 कोटींची फसवणूक

मुंबईतील वरुण इंडस्ट्रीजवर सीबीआयकडून गुन्हा दाखल

160
Varun Industries : बँकांची 388 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील वरुण इंडस्ट्रीजवर गुन्हा दाखल
Varun Industries : बँकांची 388 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील वरुण इंडस्ट्रीजवर गुन्हा दाखल

सार्वजनिक क्षेत्रातील २ बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कंपनीचे २ संचालक किरण मेहता आणि कैलाश अग्रवाल यांच्यासह अन्य २ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये तक्रारदार ही केंद्रीकृत बँक आहे. एका प्रकरणात 269 कोटी रुपयांची फसवणूक, तर दुसऱ्या प्रकरणात 118 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडने एकूण 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – Istro Mission : चांद्रयान -3 मोहिमेसाठी खामगावातील प्रसिद्ध चांदी आणि फॅब्रिक्सचा वापर)

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या फर्मवर सार्वजनिक क्षेत्रातील २ बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वरुण इंडस्ट्रीजवर या बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एप्रिल 2023 मध्ये वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या २ कंपन्या वरुण ज्वेल आणि ट्रायमॅक्स डेटा सेंटरची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणासंदर्भात ही चौकशी करण्यात आली होती. वरुण ज्वेलने पीएनबीकडून कर्ज घेऊन त्यांच्या खात्यात 46 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. यानंतर वरुण ज्वेलचे Non-Performing Assets म्हणजेच अनुत्पादित मालमत्ता झाले आहे.

पंजाब नॅशनल बॅंकेचे नुकसान
वरुण ज्वेलने पंजाब नॅशनल बॅंकेकडून कर्ज घेऊन 8 कोटी रुपये मॉरिशसमधील सहाय्यक कंपनीला हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. वरुण ज्वेलचे खाते अनुत्पादित झाल्यानंतर पंजाब नॅशनल बॅंकेचे 63 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रकडूनही कर्ज

वरुण इंडस्ट्रीजची दुसरी कंपनी ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेसशी संलग्न असलेल्या ट्रायमॅक्स डेटासेंटर सर्व्हिसेसने 2014 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रकडून 29 कोटी रुपयांचं कर्ज घेतले होते आणि अनेकांना पैसे हस्तांतरित केले होते.

ट्रायमॅक्स आयटीला 190 कोटी रुपयांचे कर्ज

कंपनीने इतर अनेक बँक खात्यांमधून पैसे काढले आणि राउटिंग सेलद्वारे होल्डिंग कंपनीच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले. अशा परिस्थितीत 2018 मध्ये त्याचे खाते एनपीए झाले. ट्रायमॅक्स आयटीने 190 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून निधीचा गैरवापर केला आणि त्याचे खाते 2017 मध्ये एनपीए झाल्याचा आरोप आहे. चौकशीनंतर सीबीआयने वरुण इंडस्ट्रीजविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वर्ष 1996 मध्ये स्थापन झालेली वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड स्टेनलेस स्टील किचनवेअर आणि हाऊसवेअर वस्तूंच्या निर्यातीच्या व्यवसायात काम करते. वरुण इंडस्ट्रीज 1500 प्रकारच्या किचनवेअर, हाउस वेअर, टेबलवेअर, कटलरी आणि इतर विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन आणि निर्यात करते. कंपनी देशांतर्गत पुरवठादारांमार्फत ही उत्पादने तयार करते आणि जगभरातील अनेक देशांमध्ये निर्यात करते.

वरुण इंडस्ट्रीजचे इन-हाउस मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि वेअरहाउस सध्या ठाणे जिल्ह्यातील वसई (पू) येथे आहे. वरुण इंडस्ट्रीजने पवनचक्की, जलविद्युत ऊर्जा, लोह आणि खनिज खाणकाम, तेल आणि वायू ड्रिलिंग यांसारख्या इतर व्यवसायांमध्येही पाऊल टाकले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.