Aapla Dawakhana : रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची भाजपची आयुक्तांना सूचना

आज मुंबईत १६० आपला दवाखाना सुरू आहेत

170
Aapla Dawakhana : रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची भाजपची आयुक्तांना सूचना
Aapla Dawakhana : रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची भाजपची आयुक्तांना सूचना

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू राहण्याच्या सध्याच्या वेळेत नोकरदार वर्गाला वैद्यकीय सुविधेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे कामावरून उशिरा येणाऱ्या गरीब नोकरदाराला या दवाखान्यात जाऊन उपचार घेता यावेत म्हणून रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत आणि इतर दिवशी रात्री १० वाजेपर्यंत हे दवाखाने सुरू ठेवले जावेत अशी सूचना आमदार योगेश सागर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. मुंबईत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना महापालिका राबवत असून जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत २० ‘आपला दवाखाना’ क्लिनिकचे उद्घाटन केल्यानंतर आज मुंबईत १६० आपला दवाखाना सुरू आहेत. ‘आपला दवाखाना’ हा उपक्रम लोकांना आरोग्य तपासणी, औषधे, तपासणी आणि निदान यांसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मोफत पुरवतो.

या दवाखान्यांची लोकप्रियता लक्षात चारकोप विधानसभा क्षेत्राचे आमदार योगेश सागर यांनी महापालिका आयुक्त व प्रशासक यांना निवेदन देत, मुंबईत आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत आणि रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत ही दवाखाने सुरू ठेवावीत अशी सूचना केली आहे. मुंबईतील बहुतेक रहिवासी कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करतात आणि संध्याकाळी ७ नंतरच घरी पोहोचू शकतात. मुंबईचा कणा आणि शहराच्या प्रगतीचे इंजिन असलेल्या कामगार वर्गासाठी संध्याकाळी ५ वाजेपूर्वी डॉक्टरांना भेटणे शक्य होत नाही. महापालिका ही यशस्वी मोफत आरोग्य सेवा चालवत असल्याने, जिथे उपचार आणि निदान आणि अगदी औषधोपचार दोन्ही मोफत आहेत, ते दवाखाने रात्री १० वाजेपर्यंत उघडले तरच मोठ्या कामगार वर्गाला त्याचा लाभ घेता येईल, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

(हेही वाचा – Mizoram disaster: मिझोराम बांधकाम सुरु असलेला पूल कोसळला ,अनेकजण ढिगाऱ्याखाली)

आठवड्यातील सहाही दिवस कामगार वर्ग कामावर असतो. वेळ मिळतो तो फक्त रविवारीच! सर्व कामगार वर्गाला हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा लाभ मिळावा यासाठी दवाखाने किमान रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत उघडे ठेवावेत, जेणेकरून लोकांना वैद्यकीय सल्ला, चाचण्या आणि मोफत उपचार मिळू शकतील. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याला आणखी यशस्वी आणि लोककल्याण व सेवा साधायची असेल तर दवाखाने रात्री १० वाजेपर्यंत आणि रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवावे लागतील असेही त्यांनी नमूद केले आहे. मला आशा आहे की प्रवासाचे अंतर, आणि मुंबईतील कामाच्या लोकसंख्येचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन याची घोषणा त्वरित करावी अशीही सूचना केली आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.