Adani Group : अदानी एंटरप्रायझेसवर स्टॉक एक्सचेंजकडून कारवाई

स्टॉक एक्सचेंजने 28 हजार रुपयांचा दंड ठोठावला

204
Adani Group : अदानी एंटरप्रायझेसवर स्टॉक एक्सचेंजकडून कारवाई
Adani Group : अदानी एंटरप्रायझेसवर स्टॉक एक्सचेंजकडून कारवाई

अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेली अदानी एंटरप्रायझेस पुन्हा वादात सापडली आहे. देशातील शेअर बाजारातील दोन्ही स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) यांनी अदानी एंटरप्रायझेसवर कारवाई केली आहे. अदानी एंटरप्रायझेसने संचालकपदावर ७५ वर्षावरील व्यक्तीची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीच्या बाबतीत सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे बीएसई आणि एनएसई या दोन्ही एक्सचेंजेसने म्हटले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याने स्टॉक एक्सचेंजने 28 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोणतीही सूचीबद्ध कंपनी विशेष ठराव पारित केल्याशिवाय वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीची गैर-कार्यकारी संचालकपदावर नियुक्ती किंवा त्यांना मुदत वाढ देऊ शकत नाही.

(हेही वाचा – WATER SHORTAGE : नागरिकांनो पाणी जपून वापरा)

दंड माफ करण्याची विनंती करणार

बीएसई आणि एनएसईने लावलेला हा दंड चुकीचा आहे. कंपनीने नियमांनुसार भागधारकांकडून मंजुरी घेतली आहे. नेक्टर लाइफ सायन्सेस विरुद्ध सेबी या प्रकरणात कायद्याचा अर्थ लावला गेला. आम्ही SEBI च्या लिस्टिंग नियमांचे पूर्णपणे पालन केले आहे आणि कंपनीकडून दंड माफ करण्याची विनंती बीएसई आणि एनएसईला करणार असल्याचे कंपनीने सांगितले. नियमांनुसार अशा नियुक्तीसाठी परवानगी घेण्याची गरज नसल्याचे ही अदानी एंटरप्रायझेसकडून सांगण्यात आले.

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ

मंगळवारी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर 2.21 टक्क्यांच्या वाढीसह 2698 रुपयांवर बंद झाला. हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर कंपनीचा शेअर 1017 रुपयांपर्यंत खाली घसरला होता. त्या पातळीपासून शेअर सावरत असल्याचे चित्र आहे.

अदानी पॉवरचा समभाग 6.94 टक्क्यांच्या जबरदस्त उसळीसह बंद झाला. अदानी समूहातील स्टॉकमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवणारा हा शेअर ठरला. अदानी पॉवरच्या गुंतवणूकदारांना व्यवहारात चांगला नफा कमावण्याची संधी मिळाली. अदानी समूहातील 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली. अदानी विल्मरचा शेअर सर्वाधिक घसरला. हा शेअर 0.94 टक्क्यांच्या घसरणीसह स्थिरावला. अदानी ग्रीन 0.49 टक्क्यांनी आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स 0.43 टक्क्यांनी घसरले. एनडीटीव्हीचे शेअर्स 0.33 टक्क्यांनी घसरले आणि अंबुजा सिमेंट्सचे शेअर्स 0.31 टक्क्यांनी घसरले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.