Lifestyle : दररोज खा मूठभर चणे आणि 5 मनुके, शरीराला होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

भरपूर अँण्टीऑक्सिडंट्स असल्यामुळे ऊर्जावाढीला मदत

196
Lifestyle : दररोज खा मूठभर चणे आणि 5 मनुके , शरीराला होतील 'हे' आरोग्यदायी फायदे
Lifestyle : दररोज खा मूठभर चणे आणि 5 मनुके , शरीराला होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

चणे आणि मनुके नेहमी वेगवेगळे खाल्ले जातात किंवा तसे खाण्याची सवय बऱ्याच जणांना असते, मात्र चणे आणि मनुके एकत्र खाल्ल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. याचे कारण म्हणजे चण्यांमध्ये जीवनसत्त्व ए, बी, सी आणि फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, यांसारखी पोषक तत्त्वे असतात, तर मनुक्यांमध्ये प्रथिने, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, जीवनसत्त्व बी-6 आणि मँगनीज यासारखी पोषक तत्त्वे असतात. यामुळे शरीराला कमालीचे आरोग्यदायी फायदे होतात.

(हेही वाचा – World Vada Pav Day : वडापावच्या जन्माची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ? जाणून घ्या कशी झाली सुरुवात)

वजन कमी करण्यासाठी
वजनवाढी नियंत्रण ठेवायचे असेल, तर चणे आणि मनुके एकत्र खावे. यामुळे भूक कमी लागते. पोट भरलेले राहते. वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खावेत.

पचनशक्ती सुधारते
चणे आणि मनुक्याचे एकत्र सेवन केल्यास पचनशक्ती सुधारायला मदत होते. ज्यांना अपचनाची समस्या भेडसावते. त्यांनी आहारात चणे आणि मनुक्याचा समावेश करावा.

डोळ्यांच्या समस्यांवर गुणकारी
चण्यांसोबत मनुके खाल्ल्यास जीवनसत्त्व ए, बीटा कॅरोटिन मिळते. डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी चणे आणि मनुके एकत्र खाल्ल्याने फायदा होतो.

शारीरिक थकवा होईल दूर
ऊर्जावाढीसाठी मनुके आणि चणे खाल्ल्यास फायदा होतो. शरीराला ऊर्जा मिळते. या दोन्ही पदार्थांमध्ये भरपूर अँण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शारीरिक थकवा दूर होण्यासाठी हे दोन्ही पदार्थ खाणे फायदेशीर ठरते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.