इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक परिश्रमानंतर भारताचे चंद्रयान ३ बुधवार, २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी चंद्रावर उतरले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतून संबंध भारतीयांचे अभिनंदन केले. भारताने आज इतिहास रचला, जीवन धन्य झाले, हा क्षण राष्ट्रजीवन चेतना जागृत करणारा आहे, हा क्षण अविस्मरणीय, अभूतपूर्व आणि विकसित भारताचा शंखनाद आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी मनोगत व्यक्त केले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
हा क्षण १४० कोटी लोकांच्या सामर्थ्याचा आहे. भारतात नवीन ऊर्जा, विश्वास, चेतना जागृत करणारा आहे. अमृत काळातील पहिल्या काळातील ही पहिली सफलता आहे, अमृत वर्षा झाली आहे. इंडिया नाऊ ऑन मुन. मी आज ब्रिक्स बैठकीत आहे. इस्रोला अभिनंदन करतो, ज्यांनी अनेक वर्षे परिश्रम केले. या अद्भुत क्षणासाठी १४० कोटी जनतेचे अभिनंदन करतो, आपल्या वैज्ञानिकांच्या परिश्रमामुळे भारत चंद्रावरील अशा भागावर पोहचला आहे ज्यावर जगातील कोणताही देश पोहचला नाही, आजपासून चंद्रविषयीची कथानक बदलतील, भारतीय पृथ्वीला आई आणि चंद्राला मामा म्हणतो, चांदा मामा बहुत दूर के, अशी म्हण असायची आता चंदा मामा बहुत पास, अशी म्हण होईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
(हेही वाचा Chandrayan 3 : चंद्रावर तिरंगा फडकला !)
Join Our WhatsApp Community