Western Railway : पश्चिम रेल्वेवर गुरुवारी ब्लॉक; लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द

163
Western Railway : पश्चिम रेल्वेवर गुरुवारी ब्लॉक; लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द
Western Railway : पश्चिम रेल्वेवर गुरुवारी ब्लॉक; लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द

मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर २४ ऑगस्ट रोजी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अतुल आणि वलसाड रेल्वे स्थानकादरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. वलसाड आरओबीच्या 36 मीटर कंपोझिट गर्डरच्या लाँचिगसाठी सकाळी 11.25 ते 1.25 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द केल्या जाणार आहेत, तर काही गाड्यांची वेळ बदलणार आहे. ब्लॉकची वेळ जरी कार्यालयीन वेळेत नसली, त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. ऐन गुरुवारी पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतल्यामुळे नोकरदारांना पर्यायी नियोजन करावे लागणार आहे.

(हेही वाचा – Zika Virus : मुंबईत झिका व्हायरसचा शिरकाव, वाचा कुठे घडली घटना)

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 09154 वलसाड-उमरगाव मेमू आणि ट्रेन क्रमांक 09153 उमरगाव- वलसाड मेमू या दोन गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. काही गाड्या उशिराने धावणार  आहेत. रेल्वे क्रमांक ०९७२४ वांद्रे टर्मिनस-जयपूर विकली स्पेशल ५५ मिनिटांनी नियमित केली जाणार आहे.

रेल्वे क्रमांक १९०१५ दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा ३५ मिनिटांनी उशिरा धावेल. रेल्वे क्रमांक १२९२६ अमृतसर- मुंबई सेंट्रेल एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटांनी धावेल. तर, रेल्वे क्रमांक २२९५४ अहमदाबाद- मुंबई सेंट्रल गुजरात एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा १ तास ३० मिनिटांनी धावेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.