देशभरात माणसांच्या वाढणाऱ्या मृत्यूच्या कारणांमध्ये कर्करोग हे दुसरे महत्त्वाचे कारण ठरत आहे. वाढत्या कर्करोगाचे रुग्ण लक्षात घेता मुंबईत डॉकयार्ड रोड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कॅन्सर रुग्णालयाची (Cancer Hospital) स्थापना करण्यात आली आहे. देशभरातील कर्करोग ग्रस्त रुग्ण माफक उपचारांसाठी मुंबईतील टाटा रुग्णालयात येत असताना आता माफक दरात मुंबईतच दुसरे रुग्णालय उपलब्ध झाल्याने टाटातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात येण्यात मदत होईल अशी आशा आरोग्यसेवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत टाटा रुग्णालय सोडले तर इतर सर्व रुग्णालय महागडी आहेत. कर्करोगावर उपचारांचा खर्चही फार जास्त आहे. देशातील कानाकोपऱ्यातून कर्करोगाचे रुग्ण परळ येथील टाटा रुग्णालयात येतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मुंबई गाठली असल्याने बरेचदा गरीब रुग्णांना राहायला जागाही नसते. टाटा रुग्णालया जवळ रस्त्यावरच रुग्ण राहतात. रस्त्यावर गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिकांनी बरेचदा प्रभाग पालिका अधिकाऱ्यांना याविषयी तक्रार केली आहे. टाटा रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात मिळणे हे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे.
टाटा रुग्णालयातील प्रतीक्षा यादीही मोठी असते. कित्येकदा वैद्यकीय चाचण्यांसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे मुंबईत कर्करोगग्रस्तांसाठी दुसरे रुग्णालय असावे असे मत वैद्यकीय क्षेत्रातून बरेचदा व्यक्त केले गेले. डॉकयार्ड रोडवर मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या रुग्णालयाच्या जागेवरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. कॅन केअर ट्रस्टच्या वतीने श्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयाचे व्यवस्थापन पाहिले जाईल. प्रसिद्ध कर्करोग सर्जन डॉक्टर सुलतान प्रधान कॅन केअर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयात स्तन कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, मौखिक कर्करोगावर उपचार दिले जातील.
(हेही वाचा :Board Exam : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आता होणार वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा)
गरीब रुग्णांना २० % खाटा सवलतीच्या दरात उपलब्ध
रुग्णालयात कर्करोग ग्रस्त रुग्णांसाठी ९७ खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.यापैकी २० % खाटा गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयात रुग्णालयात रुग्णसेवेचा अनुभव असलेले डॉक्टर प्रथमेश,पै डॉक्टर विना परमार रुग्णसेवेत हातभार लावतील. प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉक्टर तपन साखीया सुद्धा रुग्णालयात रुग्णसेवेचे काम पाहतील.याबद्दल अधिक माहिती देताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी रेश्मा नायडू म्हणाला की, रुग्णालय प्रशासनाचा आणि पालिकेचा तीस वर्षांसाठी करार झाला आहे. अजून तीस वर्षे पुढे करार वाढू देखील शकतो. १७ मजल्यांच्या इमारतीत कर्करोगावर अत्याधुनिक उपचार दिले जातील.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community