चंद्रयान -3’ने (Chandrayan-3) चंद्रावर सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाले आहे. बुधवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी ६. ०४ वाजता चंद्रयानाचं लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड झालं. यानंतर काही तास प्रतीक्षा केल्यानंतर अखेर विक्रम लँडरमध्ये असणारं प्रज्ञान रोव्हर हे बाहेर आलं आहे. विक्रम लँडरने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर १४ तासांनंतर गुरुवारी सकाळी ८. ३१ वाजता इस्रोने सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी चंद्राच्या सर्वात कठीण भागात उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.इंडियन स्पेस इन्स्टिट्यूट सेंटर (ISRO) चे मिशन यशस्वी झाले. इस्रोचा हा तिसरा प्रयत्न होता. चंद्रयानाच्या लँडर मॉड्यूलमध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचा समावेश होता. विक्रम लँडर चंद्रावर लँड झाल्यानंतर तिथे बरीच धूळ उडाली होती. ही धूळ खाली बसल्यानंतर हळू हळू प्रज्ञान रोव्हरला लँडरमधून बाहेर काढण्यात आलं आहे.
प्रज्ञान रोव्हरमधील दोन पेलोडस काय काम करणार
लेजर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (Laser Induced Breakdown Spectroscope – LIBS). चंद्राच्या पुष्ठभागावरील रसायनांच प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. त्याशिवाय खनिजांचा शोध घेईल.अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (Alpha Particle X-Ray Spectrometer – APXS) हा एलिमेंट कंपोजिशनचा अभ्यास करेल. मॅग्नेशियम, अल्यूमिनियम, सिलिकन, पोटॅशियम, कॅल्शियम आणि टिन लँडिंग साइटच्या आसपास चंद्राच्या पुष्ठभागावर या घटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न होईल.
(हेही वाचा : Seema Deo : जेष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड)
याचा फायदा काय
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर मिळून चंद्रावरील वातावरण, पुष्ठभाग, रसायन, भूकंप आणि खनिज याचा अभ्यास करेल. इस्रोसह जगभरातील वैज्ञानिकांना यामुळे चंद्रावर अधिक अभ्यास करण्यासाठी माहिती मिळेल.
चंद्रावर साकारणार अशोकचिन्ह
प्रज्ञान रोव्हरच्या मागच्या चाकांवर अशोकचिन्ह आणि इस्रोचा लोगो कोरण्यात आला आहे. यामुळे जेव्हा हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालेल, तेव्हा भारताचं अशोकचिन्ह आणि इस्रोचा लोगो हा चंद्रावरील जमीनीत छापला जाणार आहे.
Chandrayaan-3 Mission:
Chandrayaan-3 ROVER:
Made in India 🇮🇳
Made for the MOON🌖!The Ch-3 Rover ramped down from the Lander and
India took a walk on the moon !More updates soon.#Chandrayaan_3#Ch3
— ISRO (@isro) August 24, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community