सप्टेंबरमध्ये १६ दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. ४ रविवार आणि २ शनिवारी म्हणजे ६ दिवस बँका बंद राहतील. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सणांच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे १० दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. असा सेप्टेंबरचा अर्धा महिना हा बँकांच्या सुट्ट्यांमध्येच जाणार आहे.त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पहा आणि त्यानंतरच बँकेत जा.
या सुट्ट्यांमुळे लोकांना बँकेशी संबंधित कामात कोणतीही अडचण येणार नाही. कारण या सुट्या सलग नाहीत. याशिवाय एटीएम, डिपॉजिट मशिन, ऑनलाइन बँकिंग आणि मोबाइल बँकिंग या काळात सुरू राहणार आहेत. त्यामुळे सुट्यांच्या सामान्य व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. सप्टेंबरमधील या सुट्ट्या राज्यानुसार वेगळ्या आहे. कारण स्थानिक सण लक्षात घेऊन सुट्ट्या ठरवल्या जातात.
तारीख | बंद असण्याचे कारण | कुठे असेल बंद |
3 सप्टेंबर | रविवार | सर्वत्र |
6 सप्टेंबर | श्रीकृष्ण जन्माष्टमी | भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद आणि पाटणा |
7 सप्टेंबर | जन्माष्टमी (श्रावण Vd-8) / श्रीकृष्ण अष्टमी | बहुतांश ठिकाणे बंद असतील |
9सप्टेंबर | दुसरा शनिवार | सर्वत्र |
10 सप्टेंबर | रविवार | सर्वत्र |
17 सप्टेंबर | रविवार | सर्वत्र |
18 सप्टेंबर | वर्षसिद्धी विनायक व्रत / विनायक चतुर्थी | बंगळुरू आणि हैदराबाद |
19 सप्टेंबर | गणेश चतुर्थी/संवत्सरी (चतुर्थी पक्ष) | अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर आणि पणजी |
20 सप्टेंबर | गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) / नुखाई | भुवनेश्वर आणि पणजी |
22 सप्टेंबर | श्री नारायणगुरु समाधी दिन | कोची आणि तिरुवनंतपुरम |
23 सप्टेंबर | चौथा शनिवार | सर्वत्र |
24 सप्टेंबर | रविवार | सर्वत्र |
25 सप्टेंबर | श्री नारायण गुरू समाधी दिन | गुवाहाटी |
27 सप्टेंबर | मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस) | जम्मू, कोची, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम |
28 सप्टेंबर | ईद-ए-मिलाद | बहुतांश ठिकाणे बंद असतील |
29 सप्टेंबर | ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर इंद्रजात्रा / शुक्रवार | गंगटोक, जम्मू आणि श्रीनगर |
(हेही वाचा :Chandrayaan 3 : चंद्रयान मोहिमेत गुंतवणूक केलेल्या ‘या’ सहा कंपन्या मालामाल)
कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये २२ ते २४ सप्टेंबरपर्यंत सलग 3 दिवस बँका बंद राहतील
कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये २२ ते २४ सप्टेंबरपर्यंत सलग तीन दिवस बँका बंद राहतील. श्री नारायण गुरू समाधी दिनानिमित्त २२ सप्टेंबर रोजी बँका बंद राहणार आहेत. तर २३सप्टेंबर हा चौथा शनिवार आणि २४ सप्टेंबर हा रविवार आहे.