गेल्या पाच वर्षांपासून बोलणेच अशक्यप्राय होऊन बसलेल्या बॉटोक्स इंजेक्शनच्या वापरामुळे गेलेला आवाज परत मिळवण्यास मदत झाली. बोरिवलीतील एका खाजगी रुग्णालयातील उपचारातून निशिकांत भागवत या फेरीवाल्याला आपला गमावलेला आवाज पुन्हा मिळाला. स्पास्मोडिक डिस्फोनिया या अत्यंत दुर्मिळ आजारामुळे रुग्ण आपला आवाज कमावून बसला होता. स्पास्मोडिक डिस्फोनिया आजार एका लाखांमध्ये एका रुग्णाला होतो.
निशिकांत कामत याला बोलताना बराच त्रास व्हायचा. पाच वर्षांपासून आपल्या आवाजात बदल होत असल्याचे निशिकांत भागवत याच्या लक्षात आले. बोलताना अडखळणे, उच्चार अस्पष्ट होणे त्रासाला निशिकांत भागवत पूर्णपणे कंटाळले होत. अखेरीस त्यांनी बोलण्याच्या त्रासावर उपाय म्हणून डॉक्टरांकडे कडे उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला. कान-नाक-घसा तज्ञ आणि व्हॉइस सर्जन लॉरेंगोलॉजिस्ट डॉक्टर बिनी देसाई यांच्या देखरेखी खाली उपचार सुरू केले.
निशिकांत भागवत याला आवाजाची नेमकी कोणती समस्या आहे याबाबत माहिती घेण्यासाठी तर बिनी देसाई यांनी त्याच्यावर स्ट्रोबॉस्कोपी चाचणी केली. या चाचणीमध्ये निशिकांत भागवत यांना स्पास्मोडिक डिस्फोनिया नावाच्या आजाराचे निदान झाले. स्पास्मोडिक डिस्फोनिया आजारातून रुग्णाला बरे करण्यासाठी घशातील स्वरयंत्राच्या स्नायूमध्ये बॉटोक्स इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनमुळे रुग्णाचा आवाज पूर्ववत होण्यास मदत होते. वेदनारहित या प्रक्रियेमुळे निशिकांत भागवत यांनी गमावलेला आवाज दोन आठवड्यातच परत मिळवला.
(हेही वाचा – MLA Disqualification : शिवसेनेकडून सहा हजार पानांचे लेखी उत्तर विधानसभाध्यक्षांकडे सादर)
स्पास्मोडिक डिस्फोनिया आजाराबद्दल –
स्पास्मोडिक डिस्फोनिया हा एक मेंदूशी संबंधित आजार आहे. या आजारात घशात आवाज निर्माण करणारे स्नायू आकुंचन पावतात. परिणामी बोलताना आवाजात कंपने तयार होतात रुग्णाला बोलताना अडथळा निर्माण होतो. या आजाराला लॉरेन्जीअल डायस्नोनिया असेही संबोधले जाते.
स्पास्मोडिक डिस्फोनिया आजाराचे कारण –
सायनस, घशाचे इतर आजार, मेंदूचे इतर विकार, सतत जोराने बोलणे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community