राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत तालुकास्तरावर आरोग्य सुविधा पोहोचाव्यात यासाठी आदर्श कार्यप्रणालीचा अवलंब करावा.आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रूग्णालयात वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा यासाठी रूग्णालयांची अद्ययावत माहिती “आरोग्य आधार’ या ॲपद्वारे( Arogya Aadhar app) देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
धर्मादाय रुग्णालयांतर्गत सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्पिटल रजिस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, एनएचएम पीआयपी २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या बृहत आराखड्याचे सादरीकरण संदर्भात बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंत्री डॉ. सावंत बोलत होते.आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, धर्मादाय रुग्णालयाच्या कार्याबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करताना पारदर्शी काम व्हावे, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
(हेही वाचा :Ganeshotsav Pandals : गणेशोत्सव मंडळांसाठी खुशखबर; यंदा मंडपाचे भाडे माफ होणार?)
धर्मादाय रुग्णालयाची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी, आरोग्य आधार’ ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपद्वारे रुग्णांना जवळचे धर्मादाय रुग्णालय, तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, उपलब्ध खाटांची संख्यांची माहिती तसेच तात्काळ खाट राखीव करता येणार आहे. वॉर रुम, आरोग्यदूत, धर्मादाय रुग्णालय आणि व्यवस्थापनाला यासंदर्भात माहिती एकाच वेळी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नर्सिंग होम अप्लीकेशनमध्ये रूग्णालय आणि डॉक्टरांचे प्रमाणपत्र यांची त्रयस्थ पडताळणी करण्यात यावी. पदवीची सत्यता तपासण्यात यावी असे निर्देशही आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले. भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, सामान्य रूग्णालय, महिला व बाल आरोग्य केंद्र यांची मोजणी करण्यात आली आहे. केवळ अंतर आणि जिल्हयानुसार केंद्रांची मागणी न करता जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची मागणी करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरज कुमार, धर्मादाय आयुक्त श्री. महाजन यांसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community