NCP : शरद पवारांचा फोटो वापरायचा का? अजित पवार गटाने घेतला निर्णय

परवानगीशिवाय फोटो वापरणे हे योग्य नसून आपण कोर्टात खेचू, असा इशाराच शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला होता.

185

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये NCP दोन गट पडले आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत, मात्र तरीही अजित पवार गट शरद पवार यांचा फोटो वापरत आहेत, त्याला विरोध करण्यात येत आहे. त्यावर आता अजित गटाने आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे शरद पवार यांचा फोटो बॅनरवर न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे अजित पवार गटाकडून बॅनरवर शरद पवारांचाच फोटो लावला जातो, त्यामुळेही अनेकजण बुचकळ्यात पडतात. मात्र, आता या फोटोबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा NCP मी राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षासोबत द्रोह करून ज्या कुणी नवा निर्णय घेतला आहे, त्यांनी माझा फोटो वापरू नये. परवानगीशिवाय फोटो वापरणे हे योग्य नसून आपण कोर्टात खेचू, असा इशाराच शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला होता. त्यानंतर, आता शरद पवारांचे फोटो न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. अजित पवार गटाच्या कार्यक्रमात किंवा सभास्थळी शरद पवारांचा फोटो न वापरण्याचे सांगण्यात आले आहे. शरद पवार यांच्या बीडमधील सभेनंतर आता अजित पवार गटाकडूनही बीडमध्ये सभा घेत हालचाली सुरू आहेत. त्यातच, योगेश क्षीरसागर यांनी मुंबईत येऊन अजित पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी, कार्यक्रमातील बॅनरवर कुठेही शरद पवारांचा फोटो नव्हता. तसेच, २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये होणाऱ्या सभेसाठीही शरद पवारांचा फोटो न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनी सभेपूर्वी एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातही कुठेही शरद पवार यांचा फोटो दिसून येत नाही.

(हेही वाचा Chandrayaan – 3 : प्रज्ञान रोव्हर १४ दिवसांत काय शोधणार? जाणून घ्या…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.