टोमॅटोनंतर आता कांद्याचा भाव वाढला, त्यामुळे देशात जोरदार चर्चा सुरु झाली असताना साखरेचा विषय चर्चेला आला आहे. देशातील साखरेचे Sugar उत्पादन होत असलेल्या राज्यांमध्ये पाऊस समाधानकारक झाला नाही, त्यामुळे साखरेचे उत्पादन घटणार आहे, परिणामी साखरेचे दर वाढणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेणार आहे.
केंद्र सरकारने वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर 2016 नंतर प्रथमच साखर Sugar निर्यातीवर बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. असे झाले तर कांद्यानंतर साखरेच्या मुद्यावरून ऐन सनासुदीच्या काळात महाराष्ट्राचे राजकारण पेटण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी देशात सार्वत्रिक व विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दर नियंत्रणासाठी लागोपाठ पाऊले टाकत आहे. यंदा महाराष्ट्रात कमी पाऊस पडला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे साखरेच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचे दर स्थिर रहावेत यासाठी केंद्र साखर निर्यातबंदीचा निर्णय घेऊ शकते, असे म्हटले आहे. देशात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांत साखरेचे मुबलक उत्पादन होते. यापैकी उत्तर प्रदेशात यंदा चांगला पाऊस झाला. पण महाराष्ट्रात कमी पाऊस पडल्यामुळे त्याचा फटका साखर उत्पादनाला बसण्याची भीती आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत किमान 3.5 टक्के म्हणजे तब्बल 10 लाख टन साखरेचे कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत आताच साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. केंद्राने यापूर्वी साखर Sugar कारखान्यांना 61 लाख टनांपर्यंत साखर निर्यातीची परवानगी दिली होती. पण यावेळी ती दिली जाण्याची शक्यता नाही.
(हेही वाचा Chandrayaan – 3 मोहिमेच्या यशाचे Googleनेही डुडल द्वारे केले अभिनंदन)
Join Our WhatsApp Community