इंडिया आघाडीच्या लोगोसाठी नऊ डिझाईन तयार करण्यात आले होते. त्यापैकी एका डिझाईनवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. या इंडिया आघाडीचा लोगो नेमका कसा असणार, याची उत्सुकता आता समर्थकांना लागलेली आहे.
(हेही वाचा – BRICS : ब्रिक्सचा विस्तार, आता ‘या’ सहा देशांचा समावेश)
भाजपच्या विरोधात देशभरातील बहुतांश विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ (I.N.D.I.A.) आघाडी अंतर्गत मोट बांधली आहे. त्यासाठी मुंबईत इंडिया आघाडीची 31 ऑगस्टला तिसरी बैठक पार पडणार आहे. तर या बैठकीत आघाडीचा लोगोचे अनावरण होणार आहे. तत्पूर्वी हा लोगो देखील निश्चित झाला आहे. इंडिया आघाडीच्या लोगोसाठी नऊ डिझाईन तयार करण्यात आले होते. त्यापैकी एका डिझाईनवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. या इंडिया आघाडीचा लोगो नेमका कसा असणार, याची उत्सुकता आता समर्थकांना लागलेली आहे.
नऊपैकी एका डिझाईनला काही महत्त्वाच्या पक्षांनी संमती दिली आहे. फायनल झालेल्या लोगोची डिझाईन इंडिया आघाडीतील काही इतर महत्त्वाच्या पक्षांना सुद्धा दाखवून त्यांची संमती घेतली जात आहे. या इंडिया (I.N.D.I.A.) आघाडी लोगोचे अनावरण 31 ऑगस्टला रात्री होणाऱ्या बैठकीमध्ये होईल. या आघाडीला इंडिया नाव असल्याने या लोगोमध्ये भारतीय राष्ट्रध्वज अर्थात तिरंग्याची झलक दिसणार आहे.
या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीतील प्रमुख पक्षांच्या 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या बैठकीत त्या त्या पक्षाचा प्रत्येकी एक प्रमुख नेता हा समितीचा सदस्य असेल. इंडिया (I.N.D.I.A.) आघाडीचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते या समितीमार्फत घेतले जातील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community