Ajit Pawar : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये…

साडेपाचशे किलोच्या हाराने झाले स्वागत

137
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये...

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आज म्हणजेच शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरात दाखल होत आहे. यानिमित्ताने अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. अशातच अजित पवार यांच्या स्वागतासाठी तब्बल ५५० किलोचा हार आणण्यात आला आहे. सध्या सर्वत्र या हाराची चर्चा सुरु आहे.

(हेही वाचा – Wrestling Federation of India : भारतीय कुस्ती महासंघ निलंबित)

पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार (Ajit Pawar) यांचे एकूण पाच ठिकाणी स्वागत केले जाणार आहे. सलग पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात असणारी पालिका भाजपनं काबीज केली. त्यानंतर गेली साडे सहा वर्षे इथं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळाला आहे. आता परिस्थिती या उलट आहे, बदललेली ही परिस्थिती स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांकडून स्वीकारली जाणार का? हे आज होणाऱ्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) बैठकीतून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या बैठकी नंतर रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यकर्त्यांचा (Ajit Pawar) मेळावा होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर अजित पवार नेहमीच भाजपवर सडकून टीका करायचे पण आता या मेळाव्यात ते कोणावर आणि काय भाष्य करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.