Maharashtra Politics : शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील : चंद्रशेखर बावनकुळे

134
Maharashtra Politics : शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील : चंद्रशेखर बावनकुळे

आज म्हणजेच शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबदद्ल (Maharashtra Politics) एक मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत, ते भाजपसोबत गेले म्हणून पक्षात फूट पडली असं होत नाही. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अशातच आता शरद पवारांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Maharashtra Politics) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘थोड्याच दिवसांत शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील मोदी सरकारला पाठिंबा देतील,’ असं बावनकुळे म्हणाले आहेत. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

(हेही वाचा – NCP : “अजित पवार आमचेच नेते”; सुप्रिया सुळे यांच्यानंतर शरद पवारांच्या विधानाने चर्चेला उधाण)

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे

बावनकुळे (Maharashtra Politics) म्हणाले की, वर्षभराच्या कार्यकाळात मोदींच्या नेतृत्वात विश्वकर्मा योजना, ओबीसी घटकांकरता योजना अशा अनेक योजनांवर काम सुरू आहे. गेल्या नऊ वर्षात जे निर्णय घेण्यात आलेले नाही ते निर्णय आम्ही वर्षभरात घेणार आहे. केंद्र सरकारचे हे कम पाहून शरद पवारांचे लवकरच मत आणि मनपरिवर्तन होईल. त्यानंतर अजित पवारांप्रमाणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील.

बावनकुळे प्रमाणेच भाजप मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे (Maharashtra Politics) हे आगामी काळात सत्तेत दिसतील असे वक्तव्य केले आहे. उपाध्ये म्हणाले, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे लवकरच मनपरिवर्तन होणार याची खात्री आहे. देशाचा विकास हे फक्त मोदीच करू शकतात त्यामुळे आज जरी शरद पवार म्हणत असतील की भाजपसोबत जाणार नाही तरी येणारा काळात ते भाजपसोबत असतील. शरद पवार आज नाही म्हणाले उद्या कदाचित ते हो म्हणतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.