राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. धनंजय मुंडे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पीक पाणी व पावसाच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हेही या बैठकीस व्हर्च्युअली उपस्थित राहणार असून मराठवाड्यातील (Dhananjay Munde) अन्य जिल्ह्यातील मंत्रीही या बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – PM Modi Greece Visit : भारतीय पंतप्रधानांनी ४ दशकांनंतर दिली या देशाला भेट, ढोल-ताशांच्या गजरात झाले स्वागत)
या बैठकीत बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव या आठही जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण, ओढ दिलेल्या क्षेत्रात पिकांची परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आदी सर्वच विषयांवर व्यापक चर्चा व निर्णय होणे अपेक्षित आहे.
या बैठकीस कृषीमंत्री धनंजय मुंडे, (Dhananjay Munde) मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, यांसह अन्य मंत्री महोदय, तसेच विभागीय आयुक्त, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी आयुक्त, तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांसह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष किंवा व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community