आज म्हणजेच शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबदद्ल एक मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत, ते भाजपसोबत गेले म्हणून पक्षात फूट पडली असं होत नाही. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अशातच आता शरद पवारांच्या या वक्तव्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया देत संधी साधून घेतली.
(हेही वाचा – Maharashtra Politics : शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील : चंद्रशेखर बावनकुळे)
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
शरद पवार यांच्या वक्तव्याचे आम्ही स्वागत करत आहोत. (Chhagan Bhujbal) भुजबळ, मुंडे आणि इतर नेते देखील तुमचे कार्यकर्ते आहेत. अजित पवार तुमचे नेते आहेत तर आम्ही देखील तुमचे कार्यकर्ते आहोत. शरद पवार आमचेच आहेत. आम्ही देखील त्यांना जाऊन भेटलो आहोत. पक्षात फूट पडली नाही असे ते म्हणत आहेत, मग आता त्यांनी आमच्या या कृतीला समर्थन द्यावे, असं म्हणत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या संधीचा फायदा करून घेतला आहे.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत (Chhagan Bhujbal) फुट नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. बारामतीतून कोल्हापूरच्या सभेला निघण्यापूर्वी पवारांनी हे वक्तव्य केले आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे देखील पवार म्हणाले. यावर आता अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वेळ साधली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community