ठाणे जिल्ह्यात शुक्रवार,१ सप्टेंबर रोजी दिव्यांगांसाठी राज्यशासनाकडून दिव्यांग आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येणार आहे. दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यासाठी लागणारे आवश्यक दाखले काढण्यासाठी शासकीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी या योजनेचे (State Government Scheme) आयोजन केले आहे.ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अभियानात जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
दिव्यांगाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तक वितरण स्टॅाल, मतदार नोंदणी, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, शिधावाटप पत्रिका, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाण पत्र व इतर दाखले काढणारा स्टॅाल, संजय गांधी निराधर योजना, दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना अशा विविध योजनांचे स्टॅाल याठिकाणी असणार आहे. हे अभियान ठाणे जिल्ह्यात शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन समोरील शिवसमर्थ विद्यालयात पार पडणार आहे. या अभियानात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी ही सहभागी व्हावे यासाठी गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने दिव्यांगाना वाहनाने अभियान स्थळी आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
(हेही वाचा :Chandrayaan 3 : पंतप्रधान मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेणार)
दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी तसेत त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना गेले वर्षानुवर्षांपासून सुरु आहेत. परंतू, या योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. अनेकदा वारंवार सरकारी कार्यालयांना भेटी देणे एखाद्या व्यक्तीस परवडणारे नसते. तर, काही वेळेस या योजनांचा लाभ घेण्यासाठी अवश्यक असलेले दाखले त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही. दिव्यांग व्यक्तींना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान राबिवण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानात प्रत्येक विभागासाठी स्टॅाल उभारण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community