Neeraj Chopra : नीरज चोप्रा जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल; ऑलिम्पिकचे तिकीट केले पक्के

भारताच्या डी.पी. मनूने पहिल्याच प्रयत्नात ७८.१० मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ८१.३१ मीटर लांब भाला फेकला.

180
ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवलेला भारताचा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारातील पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरीतील जागा पक्की केली. यासह त्याने २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचेही (पात्रता मार्क – ८५.५० मीटर) तिकीट पटकावले.
भारताच्या डी.पी. मनूने पहिल्याच प्रयत्नात ७८.१० मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ८१.३१ मीटर लांब भाला फेकला. ८३.०० मीटर हा पात्रता मार्क होता आणि नीरजने (Neeraj Chopra) पहिल्याच प्रयत्नात सर्वात लांब भाला फेकला. जर्मनीच्या ज्युलियन वेबर ८१.०५ मीटरसह टॉपर राहिला, तर गतविजेत्या पीटर अँडरसनला ७८.०२ मीटर लांब भाला फेकता आला. जुलै २०२३ मध्ये त्याने सलग दुसऱ्यांदा डायमंड लीग जिंकली. नीरजने पाचव्या प्रयत्नात ८७.६६ मीटर भालाफेक करून ही लीग जिंकली. त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते आणि त्याने त्याच्या कामगिरीत आता सुधारणा करून भाला आणखी दूर फेकला. मागच्या वर्षी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले आणि ल्युसाने डायमंड लीगमध्ये ८९.०८ मीटर भालाफेक करून डायमंड लीग फायनलमधील जागा पक्की केली होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.