Chandrayaan-3 Photoshoot : ‘चंद्रयान-२’ ने काढले ‘चंद्रयान-३’ चे फोटो, चंद्राच्या कक्षेतून असे दिसते विक्रम लॅंडर

'चंद्रयान-३' हे चंद्राच्या कक्षेत पोहोचले असताना या ऑर्बिटरने तिसऱ्या चंद्रयानाशी संपर्क देखील साधला होता.

222
Chandrayaan-3 Photoshoot : 'चंद्रयान-२' ने काढले 'चंद्रयान-३' चे फोटो, चंद्राच्या कक्षेतून असे दिसते विक्रम लॅंडर
Chandrayaan-3 Photoshoot : 'चंद्रयान-२' ने काढले 'चंद्रयान-३' चे फोटो, चंद्राच्या कक्षेतून असे दिसते विक्रम लॅंडर

‘चंद्रयान-३’ बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. विशेष म्हणजे ‘चंद्रयान-२’ च्या ऑर्बिटने ‘चंद्रयान-३’ चे फोटो क्लिक केल्यामुळे ‘चंद्रयान-३’ चे नवीन फोटो समोर आले आहेत. ‘चंद्रयान-२’ मोहिमेतील विक्रम लँडर हे चंद्रावर क्रॅश झाले होते. मात्र, त्याचे ऑर्बिटर अजूनही कार्यरत आहे. ‘चंद्रयान-३’ हे चंद्राच्या कक्षेत पोहोचले असताना या ऑर्बिटरने तिसऱ्या चंद्रयानाशी संपर्क देखील साधला होता. आता या ऑर्बिटरमधील कॅमेऱ्याने ‘चंद्रयान-३’ मधील लँडरचे फोटो क्लिक केले आहेत.

@Chandrayaan_3 या ट्विटर हँडलवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात चंद्राच्या पृष्ठभागावर अगदी छोट्या स्वरुपात विक्रम लँडर दिसत आहे. ‘चंद्रयान-२’ चे ऑर्बिटर हे चंद्राच्या पृष्ठभागापासून भरपूर उंचावर आहे. यामधील ऑर्बिटर हाय रिझॉल्यूशन कॅमेऱ्याने (OHRC) हा फोटो काढण्यात आला आहे.

ओएचआरसी हा कॅमेरा चंद्राभोवती असणारा सर्वात हाय रिझॉल्यूशनचा कॅमेरा असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, चंद्रयानाने २३ तारखेला लँडिंग केल्यानंतर हा फोटो क्लिक केला गेला आहे, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Mumbai Municipal Corporation : लहान मुलांसाठी पालिकेकडून उपचार व पुनर्वसन केंद्र सुरू)

प्रज्ञान रोव्हरचा व्हिडिओही आला समोर –

दरम्यान, इस्रोने ‘चंद्रयान-३’ चा एक नवीन व्हिडिओ शुक्रवार (२५ ऑगस्ट) शेअर केला. यामध्ये प्रज्ञान रोव्हर हे लँडर मॉड्यूलमधून बाहेर येताना दिसत आहे. २३ तारखेला सायंकाळी ६:०४ वाजता ‘चंद्रयान-३’ ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले होते. यानंतर काही तासांनी प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.