Chandrayaan-3: भारताचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात ‘या’ रॉकेट वुमनची मोठी कामगिरी

डॉ. रितू करिथल नेहमीच अंतराळाबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि काहीतरी अनोखं करण्याचं त्यांचं ध्येय असतं.

126
Chandrayaan-3: भारताचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात 'या' रॉकेट वुमनची मोठी कामगिरी
Chandrayaan-3: भारताचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात 'या' रॉकेट वुमनची मोठी कामगिरी

‘इस्रो’ने चंद्रयान-3 ही मोहीम यशस्वी करून एक जागतिक विक्रम केला आहे. १४ जुलै ते २३ ऑगस्ट या ४१ दिवसांच्या प्रवासानंतर विक्रम लँडर चंद्रावर पोहचले. आणि ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लखनौ येथे राहणाऱ्या भारतातील “रॉकेट वुमन” अशी ओळख असणाऱ्या इस्रो च्या वरिष्ट शास्त्रज्ञ डॉ. रितू करिथल श्रीवास्तव यांनी या मोहिमेचं नेतृत्व केल आहे. अंतराळाची ओढ असलेली एक तरुणी आज भारताचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा शोध घेणं आणि त्याबद्दल जाणून घेणं हा त्याचा उद्देश आहे. डॉ. रितु करिथल त्यांनी लखनौ विद्यापीठातून शिक्षण घेतलं. नंतर, त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमई पदवी प्राप्त केली. डॉ. रितु करिथल १९९७ मध्ये इसोमध्ये रुजू झाल्या. त्या चंद्रयान-२ च्या मिशन डायरेक्टर आणि मंगळयानच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या, त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर २० हून अधिक जर्नल्स प्रकाशित केली आहेत.

(हेही वाचा : Maternity Leave : सर्व नोकरदार महिलांना मातृत्व रजेचा हक्क – दिल्ली उच्च न्यायालय)

अनेक पुरस्काराने सन्मानित
इस्रो आणि नासाच्या पेपर कटिंग्जचा त्यांच्याकडे संग्रह आहे. डॉ. रितू करिथल नेहमीच अंतराळाबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि काहीतरी अनोखं करण्याचं त्यांचं ध्येय असतं. याशिवाय त्यांना एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘इस्रो यंग सायंटिस्ट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजीज अँड इंडस्ट्रीज (SIATI) द्वारे ‘ISRO टीम अवॉर्ड फॉर एमओएम (२०१५)’, ‘ASI टीम अवॉर्ड’, ‘वुमन अचिव्हर्स इन एरोस्पेस’ (2017) असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

अनेक ठिकाणी सोशल मीडिया वर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. अनेक मुलींना त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली आहे. हा महत्त्वपूर्ण क्षण अब्ज हृदयांच्या भावनाचं प्रतिक आहे. तसेच आम्ही डॉ. रितू करिधल सारख्या दूरदर्शी लोकांचे मनःपूर्वक आभार मानतो” असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. चंद्रयान-3 मोहिमेच्या रूपाने डॉ. रितू यांच्या अभूतपूर्व कामगिरीचं नेटिझन्सकडून प्रचंड कौतुक केलं जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.