मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील, बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानतर्फे संचालित मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या गाळणी यंत्राची दुरुस्ती तसेच तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कारणाने हा जलतरण तलाव १६ ऑगस्ट २०२३ पासून बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ही कामे पूर्ण करुन सदर तलाव पुन्हा खुला करणे अपेक्षित आहे.
बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जलतरण तलाव व गाळणीयंत्र साधारणतः ३८ ते ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे आयुर्मान पूर्ण झाले आहे. काळानुरुप होत असलेली झीज लक्षात घेता या तलावाच्या गाळणी यंत्राचे अनेक भाग दुरुस्त करुन ते अद्यावत करणे देखील गरजेचे असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच फिल्टरेशन मीडिया म्हणजेच गाळणीची वाळू बदलणे देखील आता प्रस्तावित आहे.
(हेही वाचा – Tukdoji Maharaj : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा – सुधीर मुनगंटीवार)
दुरुस्तीची आवश्यकता व विशिष्ट कारणांनी हा जलतरण तलाव मध्यंतरी वारंवार बंद करावा लागला. ही परिस्थिती लक्षात घेता, सदर जलतरण तलाव व गाळणीयंत्राचे दुरुस्तीचे व्यापक काम आता हाती घेण्यात आले आहे. या कारणाने सदर जलतरण तलाव बुधवारी १६ ऑगस्ट २०२३ पासून बंद ठेवण्यात आला आहे. सर्व दुरुस्ती कामे पूर्ण होण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण करुन फिल्टर मीडियाची वाळू बदलून तसेच योग्य प्रमाणात विविध रसायनांचा वापर करुन या जलतरण तलावातील पाणी पोहण्यासाठी उपयुक्त करण्यात येणार आहे. त्यानंतर हा जलतरण तलाव सभासदांना पोहण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ रोजी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community