Nagpur-Mumbai Samruddhi Highway : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग बंद करण्याच्या याचिकेवर हायकोर्टाची राज्य सरकारला चार आठवड्याची मुदत

गेल्या काही दिवसांपासून नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर सातत्याने भीषण अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहे.

182
Samruddhi Expressway: आता मुंबई-शेगाव प्रवास अवघ्या ७ तासांत, समृद्धी महामार्गावर द्रुतगती मार्ग विकसित केले जाणार
Samruddhi Expressway: आता मुंबई-शेगाव प्रवास अवघ्या ७ तासांत, समृद्धी महामार्गावर द्रुतगती मार्ग विकसित केले जाणार

नागपूर-मुंबई हा समृद्धी महामार्ग (Nagpur-Mumbai Samruddhi Highway )झाल्यापासून यावर होत असलेल्या अपघातांचीच चर्चा सर्वाधिक होत आहे. अनेकांसाठी धोकादायक ठरतांना दिसून येत आहे. या महामार्गावर सातत्याने अपघात होत असून, ते रोखण्यात यंत्रणेला अपयश आले आहे.या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरील वाहतूक तूर्तास थांबवण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. नंतर आता हायकोर्टाने राज्य सरकारला याबाबत नोटीस जारी करत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर सातत्याने भीषण अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर आता समृद्धी महामार्गाच्या निर्माणात अनेक त्रुटी राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वीच एका खासगी बसला भीषण अपघात झाला होता. त्यात तब्बल २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर समृद्धी महामार्गावर सतत होत असलेल्या अपघाताच्या घटनांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याबाबतची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता कोर्टाने राज्य सरकारच्या एमएसआरडी विभागाला नोटीस जारी करत महिन्याभरात उत्तर मागितले आहे.

(हेही वाचा : Sharad Pawar : सुप्रिया सुळे आणि अजित पवार बहीण-भाऊ, त्यांच्या बोलण्याचा राजकीय अर्थ काढू नका – शरद पवार)

काय आहे याचिकेत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत. त्यामुळे या महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. जोपर्यंत समृद्धी महामार्गावर सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत, तो पर्यंत हा महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

हेही पहा –

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.