भारतीय नौदलात संरक्षण मंत्रालयाकडून अनेक नव्या तरतुदी केल्या जात आहेत. नुकतेच हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडसोबत भारतीय नौदलाने 5 फ्लीट सपोर्ट जहाजे खरेदी करण्यासाठी 19,000 कोटी रुपयांच्या करारावर शिक्कामोर्तब केले.
संरक्षण मंत्रालयाने याबाबत म्हटले आहे की, संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा प्रकल्प एक मोठी चालना ठरेल. ही जहाजे 44,000 टन श्रेणीची असून ती भारतीय शिपयार्डद्वारे भारतात बांधली जाणारी पहिलीच जहाजे असतील तसेच इंधन, पाणी, दारूगोळा भरण्यासाठी समुद्रातील या जहाजांचा वापर केला जाणार आहे. नौदल कार्यातील गतीशिलता वाढवण्यासाठी ही जहाजे उपयुक्त ठरणार आहेत. या जहाजांमुळे निळ्या पाण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढेल. ही जहाजे तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशाखापट्टणम येथील हिंदुस्थान शिपयार्ड कंपनीची निवड करण्यात आली आहे.
(हेही वाचा –राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार Yadu Joshi यांची निवड )
पुढिल 8 वर्षांत ही भारतीय शिपयार्ड कंपनी ही जहाजे तयार करून देणार आहे. तसेच यातील प्रत्येक जहाजाचे वजन 45,000 एवढे असणार आहे. केंद्र सरकारने 16 ऑगस्ट रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली. या 5 जहाजांमुळे छोट्या मोठ्या जहाज बांधणीसाठी मदत होईल तसेच हजारो लोकांना रोजगारही उपलब्ध होईल. सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह याचा अध्येक्षतेखाली या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
हेही पहा –