सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे, सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व करणार असा दावा स्वतः मोदींनी केला आहे, मात्र इंडिया टुडे आणि सी वोटरने मोदींचा पर्याय कोण, यावर सर्वे केला. मूड ऑफ दि नेशन असा हा सर्वे आहे, त्यामध्ये एनडीए सरकार सत्तेवर येईल. मात्र, मागच्या वेळेपेक्षा यंदा कमी जागा त्यांना मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी म्हणून काही राष्ट्रीय नेत्यांना जनतेने पसंत केले असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
हेही पहा –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तरार्धात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्वात योग्य नेते आहेत, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. १५ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान केलेल्या या सर्वेक्षणासाठी सर्व राज्यांमध्ये २५ हजार ९५१ लोकांशी संवाद साधण्यात आला. २९ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, अमित शहा हे पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून सर्वात योग्य आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा क्रमांक लागतो. २६ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केले तर १५ टक्के लोकांनी नितीन गडकरींच्या बाजूने मतदान केले.
६३ टक्के लोक नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधानी
मूड ऑफ दि नेशनच्या सर्वेक्षणातून असेही सिद्ध झाले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीवर ६३ टक्के लोक समाधानी आहेत. जानेवारी झालेल्या सर्वेक्षणात हीच टक्केवारी ७२ टक्के होती. जानेवारी २०२३ मध्ये इंडिया टुडेने केलेल्या सर्वेनुसार एनडीएला २९८ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, आताच्या सर्वेनुसार एनडीए ३०६ जागांवर यश मिळवू शकते असे म्हटले आहे. परंतु, २०१९ मध्ये एनडीएने लोकसभा निवडणुकीत ३५७ जिंकल्या होत्या. म्हणजेच या सर्वेनुसार, भाजपा सत्ता स्थापन करण्यास यशस्वी झाली तरी त्यांची जागांची एकूण आकडेवारी कमी झालेली असेल. तर, दुसरीकडे नव्याने स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला १९३ जागा मिळतील असा अंदाज आहे. जानेवारीतील सर्व्हेक्षणानुसार, विरोधकांना १५३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community