छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई येथून रविवारी (२७ ऑगस्ट) सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील व त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. या गाड्या त्यांच्या नियोजित आगमन वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील. याशिवाय पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर लाईन वर ही रेल्वेने मेगाब्लॉक (Railway Mega block) जाहीर करण्यात आला आहे.
कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड स्थानकापुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादरला येणार्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर लाईन
पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर लाईन (नेरुळ आणि किले दरम्यानच्या BSU लाईनसह आणि तुर्भे आणि नेरुळ दरम्यानच्या ट्रान्स हार्बर मार्गांसह) सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी०३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणार्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. नेरुळ येथून सकाळी १०.५० ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.५५ ते दुपारी ४.३३ पर्यंत नेरुळ करीता जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर लाईन सेवा बंद राहतील. सकाळी ११.४० ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत नेरूळहून सुटणारी खारकोपरची डाऊन लाइन सेवा आणि खारकोपर येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.२५ पर्यंत नेरूळसाठी सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत नेरुळ ते खारकोपर दरम्यानच्या BSU लाईन सेवा बंद राहतील.
या ट्रेन वेळेवर
ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी भागावर विशेष लोकल चालविण्यात येतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असेल.
(हेही वाचा :Central Mard Doctors : प्रलंबित मागण्यांसाठी डॉक्टरांची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव)
ठाण्यात यासाठी दोन दिवस ब्लॉक
ठाणे रेल्वे स्थानकाच्या मुंबई आणि कल्याण दिशेला दोन पादचारी पुलांची कामे सुरू असून त्याच्या गर्डर लाँचिंगची कामे वेगाने सुरू झाली आहेत. बुधवारी रात्री ११.५५ पासून ते गुरुवारी पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबई दिशेकडे १४० टन रेल्वे क्रेन वापरून पाच मीटर रुंदीच्या पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यात आले. अप जलद मार्गावर हे काम करण्यात आले. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनीही कामाच्या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला. या पुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवार २६ ऑगस्ट मध्यरात्रीपासून रविवार २७ ऑगस्ट पहाटेपर्यंत पुन्हा ब्लॉक घेऊन उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत.