Mhada : म्हाडाचे घर आमदारासाठी झाले ‘न परवडणारे घर’

म्हाडाच्या Mhada अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती.

156
म्हाडाने Mhada नुकत्याच जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये भाजपा आमदाराला २ घरे लागली, ती दोन्ही घरे त्यांनी सरेंडर करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार नारायण कुचे असे त्या आमदाराचे नाव आहे. त्यांना आमदार कोट्यातून आणि एससी प्रवर्गातून २ घरे लागली होती. परंतु दोन्ही घरे परत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ही दोन्ही घरे मुंबईच्या ताडदेव परिसरातील होती, लोकेशन चांगले होते. परंतु काही अडचणीमुळे, आर्थिक हफ्ता, मला बँक ५ कोटी कर्ज द्यायलाही तयार होते. परंतु एकंदर याचे व्याज आणि भविष्यातील परतफेड कशी करायची याची चिंता होती, असे कारण आमदार कुचे यांनी दिली.
हेही पहा – 
याविषयी बोलताना आमदार कुचे म्हणाले, मुंबईत माझे कुठेही घर नाही, माझे घर असावे हे स्वप्न होते. माझ्या पीएला आणि मित्राला सांगून मी म्हाडाचा अर्ज भरला होता. मात्र त्यानंतर मी गणित जुळवले, भविष्यातील कर्जाची परतफेड योग्य झाली नाही, तर आपली पत खराब होऊ शकते. आर्थिक अडचणींमुळे मी घर नाकारले. माझ्या प्रवर्गात वेटिंगला मंत्री भागवत कराड होते. त्यामुळे मी घर नाकारले तर आता त्यांनाच संधी मिळेल. मी भागवत कराडांसाठी घर सोडले नाही. माझे उत्पन्न बघा, माझे उत्पन्न शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात परतफेडीची चिंता असल्याने मी सोडले आहे, असा खुलासा भाजपा आमदार नारायण कुचे यांनी केला. मे महिन्यात म्हाडाच्या Mhada ४ हजार ८२ घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यात १ लाख ४५ हजार ८४९ जणांनी अर्ज भरले त्यापैकी १ लाख २० हजार १४४ अर्ज पात्र ठरले. म्हाडाच्या Mhada अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. नारायण कुचे यांना ताडदेव येथे लागलेल्या घराची किंमत साडे सात कोटीच्या आसपास होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.