DGP : राज्याला मिळणार पहिल्या महिला पोलीस महासंचालक?

३१ डिसेंबर रोजी राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी), रजनीश सेठ होणार निवृत्त

209
DGP : राज्याला मिळणार पहिल्या महिला पोलीस महासंचालक ?
DGP : राज्याला मिळणार पहिल्या महिला पोलीस महासंचालक ?
महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक (डिजीपी)रजनीश सेठ येत्या डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत आहे. रजनीश सेठ यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त होणाऱ्या पोलीस महासंचालक पदासाठी जेष्ठ आयपीएएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नावाची पोलिस दलात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र डिजीपीच्या शर्यतीत राज्यातील आणखी दोन अधिकारी यांच्या नावाची देखील चर्चा आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याचे पोलीस महासंचालकपदावर निवड झाल्यास रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असतील.

राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी), रजनीश सेठ हे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. हे लक्षात घेऊन गृह विभाग लवकरच संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) पाठवणार आहे, या यादीतून तिघांची निवड करण्यात येईल आणि त्यातून राज्य शासनाकडून पोलीस महासंचालक पदासाठी एकाची करण्यात येईल. राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी राज्यातील जेष्ठ आयपीएस अधिकारी यांच्यासह रश्मी शुक्ला यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. रश्मी शुक्ला १९८८ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत, सध्या त्या  सशस्त्र सीमा बलाचे पोलीस महासंचालक असून रजनीश सेठ यांच्यापेक्षा वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत रश्मी शुक्ला  २०२४ मध्ये निवृत्त होणार आहे,त्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्त झाल्यास त्यांना पूर्णपणे २ वर्षाची कालावधी मिळेल.

रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक झाल्यास राज्याला पहिल्या महिला पोलीस महासंचालक लाभतील. शुक्ला यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त, अतिरिक्त डीजी (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), डीआयजी (प्रशासन), नागपूरचे एसपी आणि सोलापूरचे डीसीपी म्हणून काम पाहिले आहे. परंतु राज्य गुप्तचर विभाग (एसआयडी) आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला, त्यांच्या काळात त्यांच्या विभागातून राज्यातील काही प्रमुख राजकीय नेत्यांचे दूरध्वनी टॅप करण्यात आले होते.

हेही वाचा -(Railway Mega block : ठाणे- कल्याण मार्गासह पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक)

शुक्ला यांच्या व्यतिरिक्त, पोलिस महासंचालक पदाच्या यादीत एक प्रमुख नाव मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे असू शकते, जे एप्रिल २०२५ मध्ये निवृत्त होणार आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार निवडणुका असल्याने राज्यात शुक्ला यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. दुसरा पर्याय फणसाळकर हे असू शकतात. परंतु, फणसाळकर यांना बढती देऊन मुंबई पोलिसांच्या प्रमुखपदी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची नियुक्ती होऊ शकते, आणि विशेष पोलीस आयुक्त पदावर दुसरे अधिकारी यांची नेमणूक होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले.

राज्य शासनाच्या यादीमध्ये पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे प्रमुख संदीप बिश्नोई, रेल्वे पोलीस डीजी प्रज्ञा सरवदे, ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते, राष्ट्रीय तपास संस्थेचे अतिरिक्त संचालक अतुल चंद्र कुलकर्णी तसेच अन्य डीजी दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही नावे असण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.