देशातील नागरिकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त वाढत असल्याचा अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने नुकताच सादर केला आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढली की, त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की, त्याचा दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे.
भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील अहवालाद्वारे प्रसिद्ध झाले आहे. भारतीयांना टाईप – 2 या प्रकारचा मधुमेह मोठ्या प्रामाणात होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षांपासून भारतीय वैद्यकीय परिषद रुग्णालये, क्लिनिक्समध्ये भेट देणाऱ्या रुग्णांना मधुमेहाची माहिती देत आहे. मधुमेह या असांसर्गिक आजारातून वाचण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन नेतत्रज्ज्ञांनी केले आहे.
(हेही वाचा – Western Railway: पश्चिम रेल्वेवरील सुरत यार्डमधील तांत्रिक कामासाठी ५६ तासांचा ब्लॉक)
मधुमेहींनी वर्षातून किमान दोन वेळा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी, मधुमेह सतत वाढत असल्यास डोळ्यातील रेटीनावर परिणाम होण्याची शक्यता असते, त्यामुळे याविषयी काळजी घ्यावी आणि वेळच्या वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी आणि औषधोपचार करावेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community