चंद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर ‘मी लवकरच तुमची भेट घेईन’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In ISRO) यांनी इस्रोच्या शात्रज्ञांना सांगितले होते. त्यानुसार आज म्हणजेच शनिवार २६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या चंद्रयान टीमची बंगळूरुमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण टीमच्या कामाचे कौतुक केले. तसेच मी तुम्हाला भेटण्यास उत्सुक होतो असंही मोदी म्हणाले. सर्वांची भेट घेऊन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या टीमशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही मोठ्या घोषणा केल्या. त्यानुसार चंद्रयान-3 लॅण्ड झालेले स्थान आता ‘शिवशक्ती’ या नावाने ओळखले जाईल असे त्यांनी जाहीर केले.
(हेही वाचा – PM Modi In ISRO : तुमच्या परिश्रमांना, धैर्याला, चिकाटीला माझे अभिवादन ! – इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेटून पंतप्रधान भावूक)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In ISRO) यांनी सांगितले की; चांद्रयान-3 चंद्रावर ज्याठिकाणी लँड झालं, त्या ठिकाणाला आता ‘शिवशक्ती पॉइंट’ असं नाव दिलं जाणार आहे. तसेच चांद्रयान-2 मधील लँडर ज्याठिकाणी क्रॅश झालं, त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ म्हटलं जाणार आहे.
#WATCH | The spot where Chandrayaan-3’s moon lander landed, that point will be known as ‘Shivshakti’, announces Prime Minister Narendra Modi at ISRO Telemetry Tracking & Command Network Mission Control Complex in Bengaluru pic.twitter.com/1zCeP9du8I
— ANI (@ANI) August 26, 2023
शिवमध्ये मानवताच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्तीपासून त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य मिळते. चंद्रावरील शिवशक्ती (PM Modi In ISRO) पाँइंट हिमालयापासून ते कन्याकुमारी जोडल्याचा बोध करत आहे, असं मोदी म्हणाले.
ज्या मनाने आपण कर्तव्य कर्म करतो, विचार आणि विज्ञानाला गती देतो आणि जे सर्वांमध्ये उपस्थित आहे, ते मन शुभ आणि कल्याणकारी संकल्पाशी जोडलेले राहावे. मनाच्या या शुभ संकल्पांची जोडले राहण्यासाठी शक्तीचा आशिर्वाद (PM Modi In ISRO) अनिवार्य आहे. ही शक्ती आपली नारी शक्ती आहे.
पंतप्रधान मोदी यांनी इस्रोच्या (PM Modi In ISRO) कार्यला सलाम केला. पुढे बोलतांना मोदींनी, ‘हा भारताच्या विज्ञान सामर्थ्याचा शंखनाद असून देशाला अभिमान वाटावा असा ह क्षण असल्याचं म्हंटलं आहे. पंतप्रधान मोदी हे त्यांचा ग्रीसचा दौरा आटोपून थेट इस्रोच्या शास्रज्ञांच्या भेटीला गेले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community