Badminton World Championship 2023 : एच एस प्रणॉयचं पदक पक्कं; सात्त्विक साईराज, चिराग जोडीचा पराभव

स्पर्धेत एच एस प्रणॉयने उपान्त्य फेरीत प्रवेश केल्याने भारताचं एक पदक निश्चित झालं आहे

116
Badminton World Championship 2023 : एच एस प्रणॉयचं पदक पक्कं; सात्त्विक साईराज, चिराग जोडीचा पराभव

ऋजुता लुकतुके

भारताच्या एच एस प्रणॉयने (Badminton World Championship 2023) जिगरबाज खेळाचं प्रदर्शन घडवत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. महत्त्वाचं म्हणजे उपउपान्त्य फेरीत त्याने अव्वल खेळाडू व्हिक्टर एक्सेलसनला एका गेमची पिछाडी भरून काढत हरवलं. व्हिक्टर या स्पर्धेत विजेतेपदांची हॅट-ट्रीक साध्य करण्यासाठी खेळत होता.

सामन्याची अंतिम (Badminton World Championship 2023) गुणसंख्या होती १३-२१, २१-१५ आणि २१-१६. पण, ही गुणसंख्या दाखवते त्यापेक्षा जास्त नाट्य आणि स्पर्धा सामन्या दरम्यान दिसली. प्रत्येक गुणासाठी दोन्ही खेळाडूंनी आपलं सर्वस्व दिलं. पण, मानसिक आणि शारीरिक कणखरता दाखवून देत प्रणॉयने हा सामना जिंकला. पराभूत झालेल्या एक्सेलसनच्या चेहऱ्यावरील निराशा लपत नव्हती.

(हेही वाचा – Mumbai Rain : विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात, अनेक भागांत साचलं पाणी)

प्रणॉय सध्या जागतिक क्रमवारीत (Badminton World Championship 2023) नवव्या स्थानावर आहे. यावर्षी त्याने मलेशियन ओपन विजेतेपदाबरोबरच ऑस्ट्रेलियन सुपरसीरिजमध्ये उपविजेतेपद पटकावलं आहे. त्या पाठोपाठ आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही आपला ठसा त्याने उमटवला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताचं या स्पर्धेतील १४वं पदक निश्चित झालं आहे.

यापूर्वी पी व्ही सिंधूने दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे. तिची २ सुवर्ण, सायना नेहवाल (१ रौप्य, १ कांस्य), किदम्बी श्रीकांत (रौप्य), साई प्रणीत (कांस्य), लक्ष्य सेन (कांस्य), दुहेरीत सात्त्विक साईराज आणि चिरागने गेल्यावर्षी मिळवलेलं कांस्य पदक तर प्रकाश पदुकोण यांनी पूर्वी मिळवलेलं कांस्य पदक अशी १३ पदकं भारताच्या खात्यात जमा आहेत. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनाप्पानेही कांस्य जिंकलं आहे.

आता प्रणॉयची (Badminton World Championship 2023) उपान्त्य फेरीत गाठ थायलंडच्या कुनलावत विदितसार्नशी पडणार आहे. विदितसाननेही इथपर्यंत मजल मारताना तैवानच्या टी डब्ल्यू वाँगला हरवलं आहे. शिवाय भारताच्या लक्ष्य सेनचाही त्याने पराभव केला होता.

प्रणॉयसाठी विदितसानचं आव्हानही तगडं असणार आहे.

दुसरीकडे, पुरुषांच्या दुहेरीत (Badminton World Championship 2023) सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचं आव्हान मात्र उपउपान्त्य फेरीत संपुष्टात आलं. डेन्मार्कच्या किम ॲसटर्प आणि अँडर्स रासमुसेन या जोडीने दोघांचा सरळ गेममध्ये २१-१८ आणि २१-१९ असा पराभव केला. अकरावी सिडेड जोडी साईराज आणि चिरागवर भारी पडली. दोघांना नैसर्गिक आक्रमक खेळ करता आला नाही. त्या नादात त्यांच्याकडून चुका होत गेल्या. या पराभवामुळे दोघांची पदकाची संधी हुकली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.