ISSF World Championships : 50 मीटर पिस्तुल प्रकारात भारताला सांघिक सुवर्ण

नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी ५० मीटर पिस्तुल प्रकारात सांघिक सुवर्ण जिंकलं. त्यामुळे एकूण १४ पदकांसह भारतीय संघ स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिला.

205
ISSF World Championships : 50 मीटर पिस्तुल प्रकारात भारताला सांघिक सुवर्ण
ISSF World Championships : 50 मीटर पिस्तुल प्रकारात भारताला सांघिक सुवर्ण

ऋजुता लुकतुके

भारताचे पिस्तुल नेमबाज तियाना, साक्षी सूर्यवंशी आणि किरणदीप कौर यांनी ५० मीटर सांघिक प्रकारात सुवर्णाला गवसणी घातली. त्यामुळे ISSF नेमबाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय संघाने एकूण १४ पदकांसह दुसरा क्रमांक पटकावला. या १४ पदकांमध्ये ५ सुवर्ण तर ९ कांस्य पदकांचा समावेश आहे. चीनने आपला अव्वल क्रमांक कायम राखला. ५० मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने १,५७३ गुण कमावले. तर रौप्य विजेता चीनचा संघ १,५६७ गुणांवर राहिला. मंगोलियाचा संघ १,५६६ गुणांसह तिसरा आला.

भारतीय संघात लक्षवेधी ठरली ती युवा नेमबाज तियाना. सांघिक स्पर्धेत तिने सर्वाधिक ५३३ गुण कमावले. आणि त्याचबरोबर वैयक्तिक प्रकारातही तिने कांस्य पदकाची कमाई केली. वैयक्तिक प्रकारात साक्षी सूर्यवंशी पाचवी तर किरणदीप कौर अकरावी आली.

(हेही वाचा –A History Day : ॲथलेटिक्स विश्वविजेतेपदाच्या भालाफेक प्रकारात एकाच वेळी तीन भारतीय अंतिम फेरीत)

शुक्रवार स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. आणि या दिवशी महिला तसंच पुरुषांच्या पिस्तुल प्रकारातील लढती बाकी होत्या. पुरुषांच्या पिस्तुल प्रकारातही ५० मीटरमध्ये भारताला २ कांस्य पदकं मिळाली. रविंदर सिंगने वैयक्तिक प्रकारात ५५६ गुणांसह कांस्य पदक जिंकलं. आणि नंतर सांघिक प्रकारात विक्रम शिंदे आणि कमलजीत यांच्या साथीने आपलं दुसरं कांस्य पदक जिंकलं. ISSF विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय संघाने १४ पदकांबरोबरच ४ पॅरिस ऑलिम्पिक पात्रता कोटाही मिळवले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.