IIT Bombay : आयआयटी मुंबईला मिळाली इतकी मोठी देणगी, कॅम्पसमध्ये उभारणार ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च हब

देणगी म्हणून मिळालेले 160 कोटी रुपये कॅम्पसमध्ये ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च हब उभारण्यासाठी खर्च करणार असल्याची घोषणा

147
IIT Bombay : आयआयटी मुंबईला मिळाली इतकी मोठी देणगी, कॅम्पसमध्ये उभारणार ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च हब
IIT Bombay : आयआयटी मुंबईला मिळाली इतकी मोठी देणगी, कॅम्पसमध्ये उभारणार ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च हब

अनामिक देणगीदाराकडून आयआयटी मुंबईला (IIT Bombay) 160 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. देणगी म्हणून मिळालेले 160 कोटी रुपये कॅम्पसमध्ये ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च हब उभारण्यासाठी खर्च केले जातील. यातील काही भाग नवीन पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वापरला जाईल. मोठी रक्कम संशोधनासाठी बाजूला ठेवली जाईल. हरित ऊर्जेला चालना देत व्यावहारिक आणि परिवर्तन करणारे उपाय शोधणे हा यामागचा उद्देश आहे, असे आयआयटीचे संचालक प्राध्यापक सुभाषीष चौधरी यांनी सांगितले.

(हेही वाचा – Indian VFX Artist : हॉलीवूडच्या संपामुळे तब्बल १० हजार भारतीय VFX आर्टिस्टचा डोक्यावर टांगती तलवार)

ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च हबमुळे सौर फोटोव्होल्टिक्स, बॅटरी तंत्रज्ञान, स्वच्छ वायु विज्ञान, जैवइंधन, पुराचा अंदाज आणि कार्बन उत्सर्जन यांसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात संशोधन करण्यात मदत होईल. आयआयटी मुंबई (IIT Bombay) तिच्या कॅम्पसमध्ये ग्रीन हब उद्योग-संबंधित प्रशिक्षण प्रदान करेल. तसेच जगातील इतर विद्यापीठे आणि संस्थांसमवेत संबंध विकसित करेल, सुभाषीष चौधरी म्हणाले.

याविषयी अधिक माहिती देताना प्राध्यापक सुभाषीष चौधरी पुढे म्हणाले, ”भारतीय शैक्षणिक क्षेत्रातील ही दुर्मिळ घटना आहे. एखाद्या परोपकारी व्यक्तीला अज्ञात राहण्याची इच्छा असते. यूएसएमधील सामान्य प्रथा आहे. मला वाटत नाही की, भारतातील कोणत्याही विद्यापीठाला अशी देणगी मिळाली आहे, जिथे देणगीदार अज्ञात राहू इच्छितो. देणगीदारांना माहित आहे की, ते आयआयटी मुंबईला पैसे देतात, तेव्हा ते कार्यक्षमतेने आणि योग्य हेतूसाठी वापरले जातील. जेव्हा संस्थेला कपातीचा फटका बसला आहे, अशा वेळी ही देणगी मिळाली आहे. सध्या संस्था विस्तारासाठी हायर एज्युकेशन फायनान्स एजन्सीकडून कर्ज घेत आहे, अशी स्वीकृती प्राध्यापक सुभाषीष चौधरी यांनी दिली.

एका दशकापूर्वी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईला हप्त्यांमध्ये 85 कोटी रुपयांची देणगी दिली होती. जून 2023 मध्ये त्यांनी आयआयटी मुंबईला (IIT Bombay)  315 कोटी रुपयांची देणगी दिली आणि त्यांची एकूण देणगी 400 कोटी रुपये झाली. भारतातील कोणत्याही संस्थेला मिळालेली ही सर्वात मोठी वैयक्तिक देणगी आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.