Metro: शिवाजीनगर-हिंजवडीत ब्रेक दाबल्यावर मेट्रो धावणार, ऊर्जाबचतीसाठी अत्याधुनिक सुविधा

मेट्रोच्या कामात सर्व प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार

170
Metro: शिवाजीनगर-हिंजवडीत ब्रेक दाबल्यावर मेट्रो धावणार, ऊर्जाबचतीसाठी अत्याधुनिक सुविधा
Metro: शिवाजीनगर-हिंजवडीत ब्रेक दाबल्यावर मेट्रो धावणार, ऊर्जाबचतीसाठी अत्याधुनिक सुविधा

शिवाजीनगर-हिंजवडीत आता ब्रेक दाबल्यावर मेट्रो धावणार असल्याचा अत्याधुनिक प्रयोग करण्यात येणार आहे. मेट्रोत ब्रेक दाबल्यावर वीजनिर्मिती होईल. वीजनिर्मितीनंतर तयार झालेल्या या विजेमुळे मेट्रो धावायलाही मदत होईल. यामुळे ऊर्जाबचत होणार आहे. नव्याने केल्या जाणाऱ्या सर्व मेट्रोंमध्ये आता याच तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने वापर करण्यात येणार आहे.

शिवाजीनगर-हिंजवडी या 23 किलोमीटर अंतराच्या पुण्यातील दुसऱ्या मेट्रोचे काम सध्या वेगात सुरू आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या माध्यमातून पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर हे काम होत आहे. त्यासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. मेट्रोच्या कामात सर्व प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. ब्रेक दाबल्यावर त्यातून वीजनिर्मिती हा त्याचाच एक भाग आहे. या यंत्रणेचे तांत्रिक नाव ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम’ असे आहे. हिंजवडी आयटी हबमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच अन्य नागरिकांसाठी ही मोठीच सुविधा ठरणार आहे.

(हेही वाचा – IIT Bombay : आयआयटी मुंबईला मिळाली इतकी मोठी देणगी, कॅम्पसमध्ये उभारणार ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च हब)

शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या प्रत्येक बोगीत इलेक्ट्रिक ब्रेकिंग तसेच इलेक्ट्रो-न्यूमॅटिक ब्रेकिंग अशा दोन यंत्रणा असणार आहेत. ट्रेनच्या मोटर्स ब्रेक कम पॉवर जनरेटर म्हणून त्या काम करतील. नेहमीच्या वेगाने ट्रेनला इलेक्ट्रिक ब्रेकिंग लागू होईल. मेट्रोच्या प्रत्येक बोगीत असे दोन स्वतंत्र इलेक्ट्रो-न्यूमॅटिक सर्किट्स असतील. एक सर्व्हिस सर्किट आणि एक सहायक सर्किट. इलेक्ट्रो-न्यूमॅटिक मॉड्युलमध्ये संपूर्ण वायवीय ब्रेक सक्रियकरण उपकरणे असतील, ज्यामध्ये वायवीय दाबनिर्मिती, दाबनियमन आणि इलेक्ट्रिक ब्रेक नियंत्रण यांचा समावेश असेल. या सर्व घटकांचे स्वतंत्र ब्रेक कंट्रोल युनिटद्वारे इलेक्ट्रो-न्यूमॅटिकली नियंत्रण आणि निरीक्षण केले जाईल.

रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम म्हणजे ?
रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ही ऊर्जा पुनर्प्राप्ती यंत्रणा आहे. मेट्रो ट्रेन जेव्हा ब्रेक लावते तेव्हा गतीज ऊर्जा सोडली जाते आणि ती मोटर्समधील विद्युतप्रवाहात साठवली जाते. मेट्रो ट्रेनच्या बॅटरीजमध्ये वितरित होणारी अशी वीज इलेक्ट्रिक जनरेटर म्हणून कार्य करते. ही एक ऊर्जा बचत प्रक्रिया असते;कारण पुन्हा निर्माण केलेली विद्युतऊर्जा त्याच ट्रेनला किंवा मार्गावरील इतर मेट्रो गाड्यांना वापरता येऊ शकते. नेहमीच्या ऊर्जावापरात यामुळे लक्षणीय बचत होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.