मॅनहोल झाकण चोरी प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती हाती आली आहे. मुंबईतील रस्त्यांवर असणाऱ्या मॅनहोल झाकणांची चोरी करून ही झाकणे गुजरात राज्यातील भंगार विक्रेत्यांना विक्री करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. झाकण चोरी प्रकरणात मुंबईतील छोटे-मोठे भंगार विक्रेते गुंतले आहेत. चोरीचे झाकणे विकत घेऊन ही झाकणे गुजरात राज्यातील बड्या भंगार विक्रेत्यांना विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
२०२३ या वर्षात मुंबईतून ४०० मॅनहोल चोरीच्या झाकणाची विक्री गुजरातमध्ये करण्यात आल्याची माहिती तपास पथकाच्या हाती लागली आहे. मॅनहोल झाकण चोरीमध्ये मोठे सिंडिकेट काम करीत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत यावर्षी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मॅनहोल झाकण चोरीच्या ५३ घटनांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी सांताक्रूझ पूर्व वाकोला दक्षिण मुंबईतील गावदेवी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता मॅनहोल झाकण चोरी प्रकरणात बहुतांश व्यसनाधीन आरोपींचा समावेश आहे.
झाकणे चोरी करण्यासाठी आरोपींकडून टेम्पो रिक्षाचा वापर केला जातो. मुंबईतील रस्त्यांवर असणाऱ्या मॅनहोल झाकणांची रात्रीच्या सुमारास चोरी केली जाते. एका रात्रीतून पाच ते सहा मॅनहोलची झाकणे चोरी करून ही झाकणे टेम्पो रिक्षात टाकून भंगार विक्रेत्यांना विकली जातात. भंगार विक्रेत्यांकडून चोरीच्या झाकणाची मोठी रक्कम दिली जाते. त्यानंतर भंगार विक्रेते या झाकणाचे तुकडे करून हे तुकडे मोठ्या प्रमाणात गुजरात येथील बड्या भंगार विक्रेत्यांना विकतात. तेथून पुढे हे झाकणे पुनर्वापरासाठी जातात अशी माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा – IIT Bombay : आयआयटी मुंबईला मिळाली इतकी मोठी देणगी, कॅम्पसमध्ये उभारणार ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च हब)
तीन मॅनहोलचे झाकण चोरल्या प्रकरणी वाकोला पोलिसांनी ऑटो चालक आणि सराईत गुन्हेगार अनिल शिवमंगल वर्मा, (३४) आणि भाजीविक्रेता अनिल शेखर केवट, (२७) या दोघांना अटक केली होती. पोलिसांनी तिसरा आरोपी शानवाज शेख याचाही कुर्ला येथे शोध घेऊन अटक केली. पहिल्यांदाच अटक करण्यात आलेल्या केवट याने वर्मा यांच्यासोबत चोरीत सहभागी झाल्याची कबुली दिली. शेवटचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. परंतु, वर्माला मॅनहोल चोरल्या प्रकरणी १० वेळा अटक झाली आहे.
गांवदेवी पोलिसांनी मुंब्रा येथुन सगीर सय्यद आणि वरळीतून इरफान शेख या तरुणांना गावंदेवी येथील पेट्रोल पंप परिसरातून तीन मॅनहोलचे झाकणे चोरल्या प्रकरणी अटक केली आहे. एमएचबी कॉलनी पोलिसांनी कमलेश ‘बंटी’ सोलंकी याला दहिसर आणि बोरिवली येथील २६ मॅनहोल कव्हर्स चोरल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. अवघ्या तीन दिवसांच्या अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका केली होती. त्याचा साथीदार अब्दुल गनी मोहम्मद नजीर शाह (५१) नावाचा भंगार विक्रेता, ज्याने चोरीचे झाकण खरेदी केले होते, त्यालाही जामीन मंजूर करण्यात आला. मॅनहोल झाकणे चोरीमध्ये भंगार विक्रेते आणि चोरांचे मोठे सिंडिकेट काम करीत असून चोरलेली मॅनहोल झाकणे ही गुजरात येथे पाठविण्यात आल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या भंगार विक्रेत्यांनी दिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community