जपानमधील अनेक उद्योग आता मुंबई मध्ये आणण्यासाठी तयार आहेत. राज्यात जपानच्या मदतीने अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबविले जात आहेत. जपानमधील अधिकाधिक गुंतवणूकदार राज्यात यावेत यासाठी आपण मुख्यमंत्र्यांच्या मदतीने एक वेगळी टीम तयार करणार आहे. तसेच जपानला चीनपेक्षा आपल्याकडे गुंतवणूक करण्यात विश्वास वाटतो. मोदी यांनी २०१४ पासून ज्या प्रकारचे संबंध प्रस्थापित केले आहे त्याचा फायदा आता आपल्याला होत असल्याचे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी मुंबई विमानतळावर पत्रकारांशी सवांद साधताना ते बोलले.
जपानच्या दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी आजच्या शेवटच्या दिवशी सोनी, डेलॉईट आणि सुमिटोमो कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. सोनी समूहाला चित्रनगरीत येण्याचे तसेच आयआयटी मुंबईशी संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली. तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सुमिटोमोला मुंबई ट्रान्सहार्बर लिंकमुळे तयार होणाऱ्या तिसऱ्या मुंबईत असलेल्या संधींची माहिती दिली.
यात वर्सोवा ते विरार ४२ किलोमीटर सी-लिंक, सीएसटी ते वडाळा अंडरलाईन मेट्रो, टोकियोसारखे मुंबईसाठी आपत्तीव्यवस्थापन यंत्रणा तयार करण्यासाठी जपान सहकार्य करणार आहे. यासह सेमी कंडक्टरसह इतर प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक करणार आहे. सोनीसारख्या मोठ्या कंपन्या देशात येण्यास तयार असल्याचेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. फडणवीस यांनी सोनी ग्रुप कार्पोरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरो कॅम्बे यांची भेट घेतली. महाराष्ट्राबरोबर काम करण्याची सोनीची इच्छा असल्याचे कॅम्बे यांनी सांगितले.
(हेही वाचा : Bachchu Kadu यांची नाराजी दूर?; मंत्रालयाशेजारील जनता दलाच्या कार्यालयाची जागा ‘प्रहार जनशक्तीला’)
संशोधनाच्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करणार असून त्यात महाराष्ट्राला प्राधान्य असेल अशी ग्वाही दिली. जपान सर्वात मोठी अडचण आहे ती भाषेची आणि त्यासाठी जपानी भाषा येणारे लोकांना एकत्र करून एक मोठ डेटा सेंटर उभ केल जाणार आहे.
काँग्रेस एक फ्रस्ट्रेटेड पार्टी
फडणवीस म्हणाले की, जपानमध्ये माझं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केलं गेलं. भारतीय दूतावासामध्ये चांद्रयान-३ चं लँडिंग लाईव्ह पाहिलं. तिथल्या भारतीयांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आपल्या वैज्ञानिकांनी चांगलं काम केलं आहे. त्यासाठी पंतप्रधान इस्रोमध्ये गेले तर काँग्रेसला वाईट वाटण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी टीकाकार काँग्रेस नेत्यांना लगावला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community