Exhibition of Rakhi’s : महापालिकेच्या २३४३ विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांचे शाळांमध्ये प्रदर्शन : काही राख्या सिमेवरील जवानांना पाठवल्या

७८१ शाळांमधील ६ वी ते ८ वी च्या इयत्तेतील २३४३ विद्यार्थ्यांनी या राखी स्पर्धेत सहभाग घेतला

160
Exhibition of Rakhi's : महापालिकेच्या २३४३ विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांचे शाळांमध्ये प्रदर्शन : काही राख्या सिमेवरील जवानांना पाठवल्या
Exhibition of Rakhi's : महापालिकेच्या २३४३ विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांचे शाळांमध्ये प्रदर्शन : काही राख्या सिमेवरील जवानांना पाठवल्या

महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकणारे विद्यार्थी स्वावलंबी बनवण्यासाठी कार्यानुभव विभागाच्या माध्यमातून प्रयत्न होत असून विद्यार्थ्यांमधील कलाकाराचा शोध घेण्यासाठी दरवर्षी राखी बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महापालिकेच्या ७८१ शाळांमधील ६ वी ते ८ वी च्या इयत्तेतील २३४३ विद्यार्थ्यांनी या राखी स्पर्धेत सहभाग घेतला होता. इयत्ता निहाय विविध माध्यम वापरून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर अशा राख्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना महापालिका शिक्षणाधिकांऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग पुरस्कृत कार्यानुभव विभागामार्फत शुक्रवारी २५ ऑगस्ट २०२३ रोजी शिक्षणाधिकारी कार्यालय करीरोड येथील त्रिवेणी संगम मनपा शालेय सभागृहात ‘राखी स्पर्धा २०२३-२४’ प्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या पारितोषिक वितरण समारंभास शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) ममता राव, उपशिक्षणाधिकारी आशा मोरे, उपशिक्षणाधिकारी (सीबीएसई) सायली सुर्वे, आदी मान्यवर उपस्थित होते.

New Project 12 3

महापालिकेच्या ७८१ शाळेतील इयत्ता सहावी ते आठवीच्या २३४३ विद्यार्थ्यांनी या राखी स्पर्धेत सहभाग घेतला होता. इयत्ता निहाय विविध माध्यम वापरून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर अशा राख्यांचे प्रदर्शन पाहून शिक्षणाधिकारी कंकाळ, राजू तडवी आणि इतर मान्यवर भारावून गेले आणि त्यांनी विद्यार्थ्यांमधील या कलाकारांचे भरभरुन कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणा-या सर्व शाळांमधील कार्यानुभव शिक्षकांचेही कौतुक केले.

अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवून महापालिका शाळेत शिकणारे विद्यार्थी स्वावलंबी व्हावे या दृष्टीने कार्यानुभव शिक्षकांनी प्रयत्न करावे, तसेच विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट कलाकार तयार करून मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे नावलौकिक करावे असे सर्वांना आवाहन केले. याप्रसंगी कार्यानुभव विभागाच्या निर्देशक तृप्ती पेडणेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सदर कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी, विभाग निरीक्षक, मुख्याध्यापक, कार्यानुभव वरीष्ठ शिक्षक, केंद्र प्रमुख, उपकेंद्र प्रमुख, कार्यानुभव शिक्षक, पालक, आणि पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यी उपस्थित होते.

(हेही वाचा –Air India: एअर इंडियाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत डीजीसीएकडून चौकशी)

कांदिवली बंदर पखाडी शाळा गणेश नगर हिंदी शाळेतर्फे मुलांनी बनविलेल्या राख्यांचे भव्य प्रदर्शन ठेवण्यात आले. सदर कार्यक्रमास माजी नगरसेवक दिपक तावडे आणि माजी कमलेश यादव तसेच इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली. अतिशय सुंदर अशा राख्या पालक आणि मान्यवरांनी खरेदी केल्या. या शाळेतील शिक्षिका रुपाली बारी यांनी हा कार्यक्रम कार्यानुभव विषयातर्गत आयोजित केला होता. मुलींनी नगरसेवकांनाही राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यातील काही राख्या काश्मीर बॉर्डर वर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांनाही शाळेतर्फे पाठवण्यात आल्या. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, कार्यानुभव निर्देशिका तृप्ती पेडणेकर मार्गदनाखाली शाळेचे मुख्यध्यापक गौड सर, सरोज सिंग, अंजली चमोला, ग्लोरी डिक्रुझ यांचेही सहकार्य लाभले.

New Project 13 4

माझी माती, माझा देश’ अभियान अंतर्गत आर/मध्य विभागाच्या मुंबई पब्लिक पोयसर हिंदी शाळा क्रमांक १. सुमेर नगर बोरिवली पश्चिम येथे सैनिकांच्या सन्मानार्थ पाठवण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. पोयसर शाळेने सैनिकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी शिक्षण आणि संस्कृती हीच शाळेची प्रगती ध्येय सलग तीन वर्ष कायम ठेवून ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या १२५ राख्या सिमेवर जवानांना पाठवल्या शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, उपशिक्षणाधिकारी निसार खान, अधीक्षक दीपिका पाटील, मुख्याध्यापिका गीता कनवजे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थी असे अनोखे उपक्रम राबवतात.

या उपक्रमासाठी शाळेचे कार्यानुभव शिक्षक कुशल जगदीश वर्तक यांनी विद्यार्थ्यांना रंगबिरंगी व तिरंगा राखी बनविण्या साठी विशेष मार्गदर्शन केले. प्रशिक्षित शिक्षक कौशलेंद्र सिंह यांनी सैनिकांच्या जीवनावर आधारित माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. सीमेवर राख्या पाठवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमित पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले तर आर / मध्य विभागाच्या प्रशासकीय अधिकारी अस्मिता कासले या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.