ब्रिटनमध्ये प्रतिबंधित ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला आणि त्याच्या साथीदाराला 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सी (NCA)च्या नेतृत्वाखालील तपासानंतर या तस्करीचा शोध लागला.
संदीप सिंग राय (37) आणि साथीदार बिली हेरे (43) अशी या आरोपींची नावे आहे. या दोघांचा OCG गुन्हेगारीशी संबंधित गटाशी संबंध होता. या दोघांनी 30 किलो कोकेन आणि 30 किलो ऍम्फेटामाइनची मेक्सिकोतून एका मालवाहू विमानातून यूकेला तस्करी केली होती.
सर्वप्रथम या दोघांनी ‘अ’ वर्गासाठी बंदी घातलेल्या ड्रग्जचा पुरवठा करण्याचा कट रचल्याचा आरोप नाकारला, परंतु या वर्षाच्या सुरुवातीला वोल्व्हरहॅम्प्टन क्राउन कोर्टात खटला सुरू होण्यापूर्वीच त्यांना दोषी ठरवण्यात आले. शुक्रवारी याच न्यायालयात त्यांनी केलेल्या गुन्ह्यांकरिता त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.
ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीचे (एनसीए) अधिकारी क्रिस डुप्लॉक यांनी सांगितले की, जर संदिप सिंग राय आणि बिली हेरे यांना पकडले नसते, तर त्यांनी हा गुन्हा पुन्हा पुन्हा केला असता. ब्रिटनच्या क्राउन न्यायालयाने या दोघांनाही 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आम्ही संदीप सिंग राय आणि बिली हेरे यांच्या तस्करीच्या योजनांवर लक्ष ठेवून होतो. त्यांच्याविषयी सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्यांना गुप्त माहिती पुरवत होतो. यात आम्हाला यश आले आणि अखेर आम्ही आरोपींना गेल्या वर्षी मे महिन्यात हिथ्रो विमानतळावरून अटक केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community